Join us

काळी जादू दाखवायला पुन्हा येतोय आर माधवन; 'शैतान'च्या सिक्वेलबाबत मोठं अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 18:32 IST

'शैतान २'ची स्क्रीप्ट लॉक करण्यात आली आहे.

सुपरस्टार अजय देवगण आणि आर माधवन यांना त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि हिट चित्रपटांमुळे ओळखला जाते.  अजय देवगणने यूकेमध्ये मृणाल ठाकूर आणि चंकी पांडेसोबत 'सन ऑफ सरदार २'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यासोबतच अजयच्या आणखी एका चित्रपटाच्या सिक्वेलला सुरुवात झाली आहे. यावर्षी रिलीज झालेल्या अजय आणि आर. माधवन यांच्या 'शैतान'ला (Shaitan) बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं होतं. या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा आहे. 

'शैतान २'ची स्क्रीप्ट लॉक करण्यात आली आहे. आता अजयशी चर्चा करून चित्रपटाच्या शूटिंगचं शेड्यूल ठरवण्यात येणार आहे. या चित्रपटाबाबत सर्वच कलाकार उत्सुक आहेत. काळी जादू दाखवायला आर माधवन पुन्हा शैतानच्या रुपात पाहायला मिळेल. काळ्या जादूवर आधारित असणाऱ्या ‘शैतान’चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं होतं. चित्रपटातील प्रत्येक कलाकारचं चाहत्यांनी आणि समीक्षकांनी कौतुक केलं होतं. 

अजय देवगण आणि आर माधवन यांचा हॉरर थ्रिलर 'शैतान'हा गुजराती चित्रपट 'वश'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. देवगण फिल्म्स, जिओ स्टुडिओ आणि पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली होती. शैतानची गोष्ट प्रेक्षकांना बरीच भावली.  आता 'शैतान'सिक्वेलमध्ये काय पाहायला मिळणार, यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :अजय देवगणआर.माधवनसेलिब्रिटीसिनेमा