काजोलचा आगामी सिनेमा‘हेलिकॉप्टर ईला'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र ट्रेलर रिलीज दरम्यान नकळत एक मोठी चूक झाली. या चुकीची माफी अजय देवगणने ट्वीटरवर मागितली आहे. ट्रेलरमध्ये लिरिसिस्ट स्वानंद किरकिरे यांच्या नावाचा उल्लेख टाकायचा राहुन गेला. त्यामुळे अजयने यागोष्टीची माफी मागितली आहे.
अजयने ट्वीट केले आहे की, ''आमच्याकडून चुकून लिरिसिस्ट स्वानंद किरकिरे यांचे नाव टाकायचे राहुन गेले आहे. मी या गोष्टीसाठी माफी मागतो आम्ही आम्ही ही चूक सुधारतोय.'' रविवारी रिलीज झालेला हा ट्रेलर आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
या सिनेमाद्वारे काजोल दीर्घकाळानंतर रूपेरी पडद्यावर कमबॅक करतेय. हा सिनेमा एका आई व लेकाची कथा आहे. यात काजोलने एका २२ वर्षांच्या मुलाच्या आईची भूमिका साकारली आहे. सिंगल पॅरेंट असलेली काजोल मुलाच्या प्रेमात इतकी गढून जाते की, स्वत:चाही तिला विसर पडतो. सतत मुलाच्या अवती-भवती राहण्याच्या प्रयत्नात पुढे या माय-लेकाचे नाते नको इतके कटू होते.मॉडर्न पॅरेंटींग या विषयावरची नाविण्यपूर्ण कथा आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नेहा धूपिया ही सुद्धा यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. काजोल व अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसचा हा चित्रपट प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला आहे. ईला' हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधरित आहे सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय दमदार आहे. प्रेक्षक हा सिनेमा पडद्यावर पाहतील, तेव्हा यातील प्रत्येक पात्राच्या प्रेमात पडतील, असे ते म्हणाले होते. हेलिकॉप्टर. हा सिनेमा ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.