'रेड' आणि 'गोलमाल अगेन'नंतर अजय देवगण आता नीरज पांडेच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. नीरज पांडे 'चाणक्य' नावाचा सिनेमा तयार करतोय. यात अजय देवगण प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही माहिती ट्विटरवर अजय देवगणने दिली आहे.
अजय देवगणने ट्वीट करत लिहिले आहे, ''नीरज पांडेच्या आगामी चित्रपट मी चाणक्यची भूमिका साकारत आहे. मी ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे.'' हा सिनेमा आचार्य चाणक्यवर आधारित आहे. चाणक्य हे भारतीय इतिहासातील हुशार व्यक्तिमत्व होते. रिलायंस एंटरटेनमेंट या सिनेमाची निर्मिती करतेय.'' चाणक्य'शिवाय अजय रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'मध्ये दिसणार आहे. यात मुख्य भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे तर अजय आणि रणवीर यात एक स्पेशल अॅक्शन सीक्वेंस असणार आहे. सारा अली खान आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल.
अजय देवगणने काही दिवसांपूर्वा आलेल्या 'रेड' सिनेमात इनक्म टॅक्स ऑफिसरची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो आता मोठ्या पडद्यावर चाणक्य बनवून प्रेक्षकांना उपदेश देताना दिसणार आहे.
नीरज पांडेबाबत बोलायचे झाले तर स्पेशल 26, बेबी, रुस्तम, एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी, नाम शबानासारख्या सिनेमांचे निर्माण केले आहे. नीरजचे अधिकतर सिनेमे देशभक्तीवर आधारित आहेत.