अजय देवगण बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अजय देवगणने मुंबईतल्या महागड्या भागात प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजयने मुंबईच्या अंधेरी वेस्ट भागात एका ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक केली आहे. अभिनेत्याच्या नवीन मालमत्तेची किंमत 45 कोटी रुपये आहे आणि त्यात ऑफिस युनिट्सचा समावेश आहे. अजयने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
अजय देवगणने दोन वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये पाच ऑफिसची जागा खरेदी केली आहे. अभिनेत्याची स्वतःची निर्मिती आणि वितरण कंपनी आहे, अजय देवगन एफफिल्म्स (एडीएफ), 2000 मध्ये स्थापन झाली. डेटा अॅनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सच्या मते, सिग्नेचर बिल्डिंगमधील वीरा देसाई रोडवार, ओशिवराचे एकूण क्षेत्रफळ १३,२९३ स्क्वेअर फूट आहे. अभिनेत्याने प्रॉपर्टीसाठी 45.09 कोटी रुपये दिले आहेत.
ADF व्यतिरिक्त, अजयची एक व्हिज्युअल इफेक्ट कंपनी NY VFXWAALA देखील आहे, ज्याचे नाव त्याच्या आणि काजोलच्या मुलांनी न्यासा देवगण आणि युग देवगण यांच्या नावावर आहे. 'प्रेम रतन धन पायो', 'तमाशा', 'बाजीराव मस्तानी', 'मेरसाल', 'दिलवाले', 'फोर्स 2' आणि 'सिम्बा' यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये त्याचा सहभाग आहे.अजयने ही जागा नेमक्या कोणत्या ऑफिससाठी केली हे अजून कळलेले नाही.
16 व्या मजल्यावर असलेल्या तीन युनिटची किंमत 30.35 कोटी रुपये आहे. 17 व्या मजल्यावर 14.74 कोटी रुपयांना दोन ऑफिस युनिट्स देखील विकत घेतले आणि यासाठी 88.44 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. काजोलने मुंबईत 16.5 कोटी रुपयांचे घर खरेदी केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी या मालमत्तेची नोंदणी करण्यात आली.
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अजय देवगणचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. यामध्ये रोहित शेट्टीच्या 'सिंघम 3'चा समावेश आहे. या चित्रपटातून दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेतही पदार्पण करत आहे. याशिवाय 'गोलमाल 4'साठी अजय आणि रोहित पुन्हा एकत्र येणार आहेत.