बॉलिवूडचा 'सिंघम' म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgn) आज ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अजय देवगणनेबॉलिवूडमध्ये जबरदस्त अभिनय आणि एक्शनच्या जोरावर नाव कमावलं आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सगळेच त्याला अजय देवगण नावानेच ओळखतात. पण तुम्हाला माहितीए का अजय हे त्याचं खरं नाव नाहीए. मग त्याचं खरं नाव काय आहे आणि अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्याने नाव का बदललं जाणून घेऊया.
'फूल और कॉंटे' सिनेमातून अजयने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचे ते खोल डोळे, चेहऱ्यावरची शांतता, आणि पहिल्याच सिनेमात त्याने केलेला अॅक्शन स्टंट बघून प्रेक्षक वेडे झाले आणि बॉलिवूडला नवा स्टार मिळाला. अजयला करिअरच्या सुरुवातीलाच पहिलं नाव बदलावं लागलं होतं. त्याचं खरं नाव विशाल देवगण (Vishal Devgn) होतं. मात्र त्याने नाव बदललं कारण त्याला वेगळं दिसायचं होतं. 2009 मध्ये एका ओपन मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत अजय म्हणाला, 'जेव्हा मी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत होतो तेव्हा आणखी तीन विशाल सुद्धा त्यांचा डेब्यू करत होत.त्यामुळे माझ्याजवळ नाव बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यामुळेच मी कधी गर्दीत हरवलो नाही. माझे जुने मित्र अजुनही मला VD अशी हाक मारतात. '
अजय म्हणतो, 'मला अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत लॉंच करण्याचं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. मला फक्त त्यांचं स्वप्न साकार करायचं होतं. मी त्याकडेच लक्ष दिलं. मी यशस्वी होईल की नाही असा विचारच मी कधी केला नाही.'
अजयने फिल्म इंडस्ट्रीत ३२ वर्ष पूर्ण केले आहेत. आज तो सर्वात प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा 'भोला' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.