Join us

बाबो! RRR सिनेमातील 8 मिनिटाच्या शूटसाठी अजय देवगणने घेतलं 'इतकं' मानधन, आकडा वाचून येईल चक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:09 PM

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतात.

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतात. त्यांच्या भूमिकेनुसार त्यांना मानधन दिलं जातं. केवळ सिनेमाच नाही, तर काही अभिनेते केवळ सिनेमातील कॅमिओसाठी कोट्यवधींचं मानधन घेतात. पण भारतातील एक अभिनेता असा आहे, जो एका मिनिटासाठी कोट्यवधी रुपये घेतो. तुम्हाला वाटलं असले शाहरुख खान, सलमान खान यांच्याशिवाय दुसरा कोणत्याच अभिनेत्याला इतकं मानधन मिळत नसेल. भारतातील सर्वात महागडा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता अजय देवगन आहे.

 एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटात  अजय देवगणने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. अवघ्या काही मिनिटांच्या या भूमिकेसाठी त्याने तगडं मानधन घेतल्याचा खुलासा आता झाला आहे. यासाठी त्याने  35 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. सिनेमात अभिनेत्याने फक्त 8 मिनिटांची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेत्याने एका मिनिसाठी तब्बल 4.5 कोटी मानधन घेतलं होतं.  ‘गेट्स सिनेमा’च्या एका पोस्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर जगभरात नाव कमावलं.  अजयने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अजय देवगणभारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या स्टार्सपैकी एक आहे, तो कोट्यवधी रूपये मानधन घेतो. फक्त सिनेमेच नाही तर, इतर मार्गांनी देखील अजय देवगण कोट्यवधी रुपये कमावतो. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. 

अजयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास शैतान सिनेमा हा  8 मार्चला रिलीज होणार आहे. तर यानंतर अजय 'सिंघम अगेन'मधून प्रेक्षकांच्या भेटील येईल. सिनेमात अजय देवगन याच्यासोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमा 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे. यात अर्जुन कपूर या चित्रपटात एका भयानक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :अजय देवगणसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा