अजय देवगणची (Ajay Devgn) मुलगी नीसा देवगण (Nyasa Devgn) तिच्या मित्रमंडळींसोबत पार्ट्या करण्यात मग्न असते. सतत ती या कारणाने ट्रोल होत असते. पार्टीनंतर तिचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पापाराझी तर कायम तिच्या मागे कॅमेरे घेऊन फिरतात. आपल्या बोल्ड लुकने ती लक्ष वेधून घेत असते. नुकतीच पुन्हा एकदा तिला पार्टीनंतर बघितले गेले. मित्र ओरी सोबतच ती यावेळी दिसली. नेहमीच नशेत असते असं म्हणत तिला नेटकऱ्यांनी पुन्हा ट्रोल केले आहे.
न्यासा देवगण नेहमी पार्टी आणि फॅशन अशाच मूडमध्ये दिसते. स्टारकिड्सचा लाडका मित्र ओरीसोबत ती पुन्हा पार्टीनंतर दिसली. न्यासा यावेळी ग्रे रंगाचा क्रॉप टॉप आणि निळी जीन्स अशा कूल लुकमध्ये दिसली. ओरी आणि न्यासा एकाच कारमधून गेले. पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी आधीपासूनच गर्दी केली होती.
पापाराझी तिचं नाव चुकीचं घेत होते. तेव्हा लगेच त्याने कारमध्ये बसल्यावर 'माझं नाव नीसा आहे' असं हसतंच ठणकावून सांगितलं. पार्टीतून बाहेर आल्यानंतर नीसाला धड चालताही येत नव्हतं. तसंच ती अडखळत चालताना दिसली. त्यामुळे नशेतच दिसतीए असं म्हणत तिला नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ट्रोल केलं.
काही दिवसांपूर्वीच अजय देवगणने नीसाला करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगवर मौन सौडलं होतं. या गोष्टी आहेत ज्याकडे मी दुर्लक्ष करतो आणि मुलांनाही तेच सांगतो असं तो म्हणाला होता. नीसा सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. अभिनयात पदार्पण करण्याचा तिचा आता तरी विचार नाही असं तिची आई अभिनेत्री काजोलने स्पष्ट केलं होतं.