बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने बर्याच दिवसानंतर आपल्या नव्या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा सिनेमा येत्या 15 ऑक्टोबरला दसरानिमित्त थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे.
अजय देवगण यांनी ट्विट केले की, “आता मैदान 2021 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. शूटिंगची सुरुवात 2021 च्या जानेवारीत सुरू होईल. यासह त्याने सिनेमातील एक पोस्टरही शेअर केले आहे, ज्यामध्ये तो रेट्रो लूकमध्ये दिसतो आहे.
या सिनेमात अजय देवगण फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारेल. रहीम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने १९५६ च्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत बाजी मारली होती. भारतीय फुटबॉल संघाचा सुवर्ण काळ म्हणवल्या जाणा-या १९५२ ते १९६२ हा १० वर्षांचा प्रवास या चित्रपटात रेखाटला जाईल. अजय देवगन सोबत प्रियामणि, गजराज राव आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रुद्रनील घोष या चित्रपटात आहेत. अमित आर शर्मा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओ, बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणवा जॉय सेनगुप्ता यांनी केलीय. सिनेमातील काही सीन्सची शूटिंग लखनऊ, कोलकत्ता आणि मुंबईत झाली आहे. जानेवारी महिन्यात याचे फायनल शूट होणार आहे.