अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. पहिल्या वीकेंडला सिनेमाने भारतात 61.75 कोटींचे कलेक्शन केली. तर दुसरीकडे दीपिका पदुकोणचा 'छपाक'ला तान्हाजी सिनेमाने मागे टाकले आहे. विशेष म्हणजे 'तान्हाजी'चे कलेक्शन शनिवार आणि रविवारी झपाट्याने वाढले. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारीच्या कलेक्शनमध्ये 36 टक्क्यांची वाढ झाली, तर रविवारी चित्रपटाने 72.7 टक्के अधिक कमाई करण्यात सिनेमाने यश मिळवले.
'छपाक'बद्दल बोलायचे म्हणजे या चित्रपटाने भारतात पहिल्या वीकेण्डला 19.02 कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ 4.77 कोटींची कमाई केली होती. मात्र, दुसर्या आणि तिसर्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ दिसून आली. शनिवारचे कलेक्शन शुक्रवारच्या तुलनेत 44.65 टक्के आणि रविवारी 54 टक्के अधिक होते.
'तान्हाजी' आणि 'छपाक' यांच्या कलेक्शनच्या आकड्यात मोठा फरक असला, तरी दोन्ही चित्रपटांनी जवळपास निर्मिती खर्चाचा निम्मा खर्च वसूल केला आहे. 'तान्हाजी' हा अजय देवगणच्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा असून त्याचे बजेट 120-150 कोटी आहे. त्याचबरोबर 'छपाक'द्वारे दीपिकाने निर्माती म्हणून इंडस्ट्रीत एक नवीन सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या निर्मितीसाठी 35-40 कोटी रुपये खर्च झाले समजतंय.