Join us

आधी ‘तान्हाजी’ला म्हटले ‘वाहियात फिल्म’, आता मागितली माफी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:38 PM

जनता की आवाज नकारे खुदा...

ठळक मुद्दे‘तान्हाजी’च्या कलेक्शनबद्दल सांगायचे झाल्यास, या चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा 182 कोटींवर पोहोचला आहे.

केआरके अर्थात कमाल आर खान स्वत: सर्वश्रेष्ठ चित्रपट समीक्षक समजतो. पण खरे सांगायचे तर त्याचे सोशल मीडियावरचे रिव्ह्यू अनेकदा मनोरंजनाचा भाग ठरतात. अशात केआरकेला त्याच्याच चित्रपटाच्या समीक्षेसाठी माफी मागावी लागत असेल तर त्यात काहीही नवल नाही. होय, ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ रिलीज झाल्यानंतर केआरकेने त्याचा रिव्ह्यू शेअर केला होता.

 

‘तान्हाजी’ एक ‘वाहियात’ चित्रपट असल्याचे म्हणत, या सिनेमाला त्याने केवळ एक स्टार दिला होता.  ‘पानीपत’ हा ‘तान्हाजी’ पेक्षा 10 पट अधिक चांगला असल्याचेही त्याने आपल्या रिव्हूमध्ये म्हटले होते. पण आता आपल्या याच रिव्ह्यूसाठी केआरकेने माफी मागितली आहे. स्वत:चीच समीक्षा मागे घेण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

केआरकेने ट्विटरवर एक पोस्ट लिहित ‘तान्हाजी’च्या रिव्ह्यूबद्दल माफी मागितली आहे. ‘ तान्हाजी सिनेमाने दुस-या आठवड्यातही दमदार कामगिरी केली.  हा सिनेमा 250 कोटींचा आकडा नक्कीच पार करेल, अशी आशा आहे. हा एक हिट सिनेमा आहे. जर प्रेक्षकांना हा सिनेमा आवडत असेल तर मी माझ्या रिव्ह्यूबद्दल माफी मागतो. कारण ‘जनता की आवाज नकारे खुदा’,’असे त्याने आपल्या माफीनाम्यात लिहिले आहे.

 

‘तान्हाजी’च्या कलेक्शनबद्दल सांगायचे झाल्यास, या चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा 182 कोटींवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत अजयचा हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असे मानले जात आहे. या चित्रपटाचा बजेट 125 कोटी रूपये आहे. हा बजेट कधीच वसूल झाला आहे. सुमारे 3500 स्क्रिन्सवर रिलीज झालेला ‘तान्हाजी’ ओम राऊतने दिग्दर्शित केला असून अजय देवगण व भूषण कुमार या दोघांची निर्मिती आहे.

टॅग्स :कमाल आर खानतानाजी