Join us

'सिंघम अगेन'च्या शूटदरम्यान अजय देवगणला झाली होती दुखापत, २-३ महिन्यांसाठी गेली होती दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 9:41 AM

Ajay Devgan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी 'बिग बॉस १८'च्या वीकेंड का वारमध्ये दिसले. ते त्यांच्या आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) 'बिग बॉस १८'च्या वीकेंड का वारमध्ये दिसले. ते त्यांच्या आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' (Singham Again Movie) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. शोमध्ये अजय आणि रोहितने खूप धमाल केली. सिंघम अगेन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या. सलमान खानशी संवाद साधताना अजयने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

अजय देवगणने सांगितले की, स्टंटच्या वेळी काही अडचण आली होती ज्यामुळे तो शूटिंगदरम्यान जखमी झाला होता. होस्ट सलमान खानने सांगितले की, शूटिंगदरम्यान अजय देवगणने त्याला एक ॲक्शन सीन दाखवला होता आणि त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की अजयची काही महिने दृष्टी गेली होती.

अजय देवगणच्या डोळ्याला झाली होती दुखापतसलमान खानने सांगितले की, चुकीच्या टायमिंगमुळे अजयच्या डोळ्याला दुखापत झाली. अजयने मला तो शॉट दाखवला. त्याला कोणीतरी काठीने मारायला आले आणि त्याचा टायमिंग चुकला म्हणून ती काठी थेट त्याच्या डोळ्यावर लागली. तेव्हा अजय म्हणाला की,  २-३ महिन्यांसाठी दृष्टी गेली होती. त्यानंतर आता अजय बरा झाला आहे.

'सिंघम अगेन'बद्दल'सिंघम अगेन' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर अजय देवगण आणि करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटात दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूरसारखे कलाकार आहेत. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटाची टक्कर कार्तिक आर्यनच्या 'भूलभुलैया ३' सोबत आहे. कार्तिक व्यतिरिक्त या चित्रपटात विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी सारखे कलाकार आहेत. या हॉरर कॉमेडीबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :अजय देवगण