Join us  

उफ्फ!! अजय देवगण-काजोलच्या लेकीचा बोल्ड लुक, सोशल मीडियावर न्यासाच्या फोटोंचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 3:49 PM

काजोल (Kajol) व अजय देवगणची (Ajay Devgn) लाडकी लेक न्यासा देवगण (Nysa Devgn) भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चर्चेत राहणे तिलाही जमते.

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा ‘हम भी कुछ कम नहीं’ असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.  याच यादीत आता आणखी नव्या नावाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे न्यासा देवगण. न्यासाची वेगळी ओळखची तशीही गरज नाही. काजोल (Kajol) व अजय देवगणची (Ajay Devgn) लाडकी लेक न्यासा देवगण (Nysa Devgn) भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चर्चेत राहणे तिलाही जमते. सध्या न्यासा जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचे व्हायरल फोटो. 

होय, न्यासाने इन्स्टाग्रामवर तिचे पेज प्रायव्हेट केले आहे. पण तिच्या नावाचे अनेक फॅन पेजेस आहेत. या फॅन पेजवरचे न्यासाचे फोटो सतत व्हायरल होत असतात.  या फॅन पेजवर न्यासाचे ताजे फोटो शेअर करण्यात आले आहेत आणि या फोटोंनी इंटरनेटवर नुसता धुमाकूळ घातला आहे.

एका फोटोत न्यासा रेड कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये आहेत. मैत्रिणींसोबत ती पोझ देताना दिसतेय. या फोटोत न्यासा एकदम वेगळी आणि सुंदर दिसतेय.  एका अन्य फोटोत न्यासा ब्लॅक टॉपमध्ये पोझ  देताना दिसतेय.

 न्यासा सध्या सिंगापूरच्या स्कूलमध्ये शिकतेय.  मध्यंतरी न्यासा बॉलिवूडमध्ये करिअर करणार, अशीही चर्चा होती. पण न्यासाचा तसा काहीही इरादा नाही.  

अजय देवगण आणि काजोल यांची लेक म्हणून न्यासाला सारेच ओळखतात. याआधी न्यासा तिच्या दिसण्यावरून अनेकदा ट्रोल झाली. सेलिब्रेटींची मुलं म्हणजे अगदी ग्लॅमरस, गोरे दिसण्यातही सुंदर अशी  सर्वसामान्यांची कल्पना असते. मात्र जेव्हा न्यासाचे फोटो समोर आले तेव्हा तिचा तेव्हाचा लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले होते. मात्र न्यासाने ही टीका अगदी पॉझिटीव्हली घेत स्वत:च्या लूक्सवर प्रचंड मेहनत घेतली. म्हणून आज न्यासाचे नवीन फोटो पाहून सारेच आवाक होत आहेत. अचानक आलेला इतका मोठा बदल पाहून आता तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पूवीर्पेक्षा न्यासा अधिक सुंदर दिसू लागली आहे. 

टॅग्स :अजय देवगणकाजोल