बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी काजोल अनेकदा तिच्या चुलबुल्या अंदाजमुळे चर्चेत असते. पण यावेळी तो त्याच्या 'द ट्रायल: प्यार, कानून, धोखा' या प्रसिद्ध मालिकेमुळे चर्चेत आहे. ओटीटीच्या दुनियेत या मालिकेतून पदार्पण करणारी काजोल एका वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. काजोलसोबत या वेबसिरीजची सहनिर्मिती करणारा अभिनेता अजय देवगणही या ट्रेलर लाँचला उपस्थित होता. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजयने काजोलबद्दल खिल्ली उडवताना दिसतोय.
खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, जेव्हा अजयला विचारले जाते की घरी निर्णय कोण घेतं? तू की काजोल? याप्रश्नाच अजय देवगणने दिलेले उत्तर ऐकून एकच हशा पिकला. अजयने हा प्रश्न विचारणाऱ्याला म्हणाला की, तुझं लग्न झालं आहे का? तुमच्या इथं निर्णय कोण घेते. जो विवाहित आहे, त्यांना या प्रश्नाचे उत्तर माहित आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, उत्तर एकच असेल.
'द ट्रायल - प्यार, कानून, धोका' ही वेबसिरीज 'द गुड वाईफ'चे भारतीय रूपांतर आहे. बनिजय आशिया आणि अजय देवगण फिल्म्स निर्मित, याचं दिग्दर्शन द फॅमिली मॅन लेखक-दिग्दर्शक सुपरण एस. वर्मा यांनी केले आहे. यात काजोल नयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारत आहे. तिच्याशिवाय या वेबसिरीजमध्ये शीबा चड्ढा, जिशू सेनगुप्ता, एली खान, कुब्बरा सैत आणि गौरव पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या कोर्टरूम ड्रामामध्ये काजोलने एका गृहिणीची भूमिका केली आहे जिचा पती सार्वजनिक घोटाळ्यांनंतर तुरुंगात जातो आणि नयोनिकाला वकील म्हणून कामावर परत जावं लागते.