अजय देवगणच्या 'मैदान' सिनेमाची खूप चर्चा झाली. 'मैदान' चा विषय, आशय, कलाकारांचा अभिनय अशा गोष्टींचं खूप कौतुक झालं. भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ 'मैदान'मधून पाहायला मिळाला. अजय देवगण - प्रियामणी आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने 'मैदान' सिनेमा चांगलाच गाजला. ज्यांना 'मैदान' पाहता आला नाही त्यांच्यासाठी सिनेमा घरबसल्या पाहण्याची सुवर्णसंधी आहे.
कुठे पाहाल 'मैदान'?
अजय देवगणचा 'मैदान' आता OTT वर रिलीज झालाय. ईदच्या मुहुर्तावर थिएटरमध्ये रिलीज झालेल्या अजयच्या 'मैदान' सिनेमाची खूप वाहवा झाली. आता अजयचा 'मैदान' प्राईम व्हिडीओवर रिलीज झालाय. पण कहानी में ट्विस्ट असा आहे की, 'मैदान' पाहण्यासाठी तुम्हाला ३४९ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच 'मैदान' सिनेमा प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला असला तरी तो रेंटवर उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांत 'मैदान' सर्वांसाठी मोफत उपलब्ध होईल अशी चर्चा आहे.
'मैदान' सिनेमाबद्दल...
'मैदान' सिनेमा २०२४ मध्ये ईदच्या मुहुर्तावर रिलीज झाला. 'मैदान' सोबत अक्षय कुमारच्या 'बडे मिया छोटे मिया'ची चांगलीच टक्कर होती. तरीही 'मैदान'चं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगलं कौतुक झालं. सिनेमात अजय देवगण यांनी भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहमान यांची भूमिका साकारली होती. सिनेमात प्रियामणी, गजराज राव, रुद्रनील घोष असे कलाकार होते.