Join us  

अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्रेंन्सीचा 'ग्लो'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 4:14 PM

Ishita Dutta Maternity Photos: अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. अलीकडे, तिचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल इशिता दत्ता  (Ishita Dutta)आणि वत्सल शेठ (Vatsal Sheth) लवकरच आई-बाबा होणार आहेत. खरं तर, दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  इशिता दत्ता प्रग्रेंट आहे. दरम्यान, अलीकडेच इशिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

इशिताने फ्लॉन्ट केला बेबी बम्प इशिता दत्ताने  तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही सुंदर फोटो शेअर केलेत, ज्यात अभिनेत्री ट्रॉपिकल-प्रिंटेड मॅक्सी ड्रेस परिधान करून तिचा बेबी बम्प फ्लॉंट करताना दिसत आहे. नो मेकअप लूकमध्ये इशिताच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसतोय. हे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'OOTD'

इशिताच्या प्रेग्नेंसीबद्दल चाहत्यांना समजले जेव्हा ती मुंबई विमानतळावर तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. त्यानंतर या कपलन त्यांच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील पहिल्या फोटोसह प्रग्नेंन्सीची अधिकृत घोषणा केली.या स्टारकपलने फोटो शेअर करताना, ‘Baby on Board..’ असं कॅप्शन दिलं होते. त्यांच्या चाहत्यांनी आणि सेलेब्सनी दोघांवर अभिनंदनचा वर्षाव केला होता.

इशिताने बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता वत्सल सेठसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांनी 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली असून हे कपल आई-वडील होणार आहेत. यामुळेच या बातमीने इशिता आणि वत्सल खूप खूश दिसत आहेत. इशिता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. जो 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या दोन्हीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. इशिता 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती.  

टॅग्स :अजय देवगणसेलिब्रिटीप्रेग्नंसी