Join us

कधी कधी सत्य इतकं..., ‘द काश्मीर फाईल्स’वर अजय देवगण काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:08 AM

Ajay Devgn Reaction on The Kashir Files : कालच आमिर खान ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचं कौतुक करताना दिसला. आता अजय देवगणने या चित्रपटावर आपलं मत मांडलं आहे.

विवेक अग्निहोत्रींच्या (vivek agnihotri) ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. बी टाऊनमध्येही या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणारा हा सिनेमा पाहून अनेकांना अश्रू अनावर झालेत. लोक चित्रपटगृहांत ढसाढसा रडताना दिसले. आत्तापर्यंत बॉलिवूडकर या चित्रपटावर मौन बाळगून होते. पण आता बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटीही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. कालच आमिर खान या चित्रपटाचं कौतुक करताना दिसला. आता अजय देवगण  (Ajay Devgn)यानेही या चित्रपटाच्या निमित्ताने आपलं मत मांडलं आहे.

काल ‘रनवे 34’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये अजयला या चित्रपटाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारण्यात आला. सत्यघटनांवर चित्रपट बनवून प्रेक्षकांना आकर्षित करणं सद्यस्थितीत सर्वात चांगला फंडा आहे का? असा प्रश्न त्याला केला गेला. यावर, अजय भरभरून बोलला. ‘प्रेक्षकांना आकर्षित करायचं म्हणून एखादी सत्यघटना वा ओरिजनल स्क्रिप्ट शोधा, असं होत नाही. मुळात एखादी अशी सत्यघटना वा कथा असते जी जगासमोर यावी, असं मनापासून वाटू लागतं. त्यामुळे ती कथा पडद्यावर येते. मी स्वत: ‘लेजेंड आॅफ भगत सिंह’ हा सिनेमा बनवला होता. अशा काही कथा प्रचंड प्रेरणादायी असतात. कधीकधी सत्य इतकं आश्चर्यकारक असतं की तुम्ही तसं काही फिक्शन लिहू शकत नाही. म्हणून अशा काही कथा आम्ही उचलतो, त्यावर सिनेमे बनवतो. ऐरवी आम्ही स्वत:च काल्पिक कथा लिहितो आणि चित्रपट बनवत असतोच,’असं अजय म्हणाला.

अजयचा आगामी ‘रनवे 34’ हा सिनेमाही सत्यघटनेवर आधारित आहे. यात अजय मुख्य भूमिकेत आहे. शिवाय तोच या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. ‘रनवे 34’ची कथा जेट एअरवेजच्या दोहा-कोच्ची फ्लाईटमधील सत्यघटनेवर आधारित आहे. 2015 साली खराब हवामान आणि अगदी कमी दृश्यमानता असताना पायलटने जोखित पत्करत हे विमान विमानतळावर उतरवलं होतं. अशा लँडिंगला ब्लाइंड लँडिंग म्हणतात. या लँडिंगमध्ये सुमारे 150 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

टॅग्स :द काश्मीर फाइल्सअजय देवगणबॉलिवूड