Join us

सिनिअर अभिनेत्यांची खिल्ली उडविणाºया रविना टंडनला अजय देवगणने दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 3:46 PM

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रविना टंडन हिने एका वेबसाइटला मुलाखत देताना, ९० च्या दशकातील अभिनेत्यांच्या रोमान्सवरून खिल्ली उडविली होती. आता ...

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रविना टंडन हिने एका वेबसाइटला मुलाखत देताना, ९० च्या दशकातील अभिनेत्यांच्या रोमान्सवरून खिल्ली उडविली होती. आता अजय देवगणने यावर उत्तर दिले आहे. या मुलाखतीत रविनाला विचारण्यात आले होते की, ‘जर आज ‘अंदाज अपना-अपना’चा सीक्वल बनविला गेला तर तू यात काम करशील काय?’ तर तिने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, ‘होय, नक्कीच काम करणार, परंतु मला माहीत आहे की, चित्रपटाच्या सुरुवातीलाच माझा आणि करिष्माचा फोटो भिंतीवर टांगलेला दाखविण्यात येणारे तसेच सलमान खान आणि आमीर खान म्हणणार की, आमच्या पत्नींचे निधन झाले आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा २१ वर्षांच्या हिरोईन मागे पळताना दाखविण्यात येईल.’रविना तिच्या या उत्तरामधून हे सांगू इच्छित होती की, कशा पद्धतीने ९० च्या दशकातील कलाकार त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करताना रोमान्स करीत आहेत. दरम्यान, याच प्रश्नांच्या अनुषंगाने जेव्हा बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याला विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, ‘असे काही नाही. हे सर्व काही चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार होत असते.’ एक उदाहरण देताना अजय देवगणने म्हटले की, ‘गोलमान अगेनमध्ये मी तब्बूबरोबर काम करीत आहे. त्यामुळे यावर वेगळे बोलण्याची काहीही गरज नाही.’खरं तर अजय देवगणच्या या प्रतिक्रियेवर खरोखरच विचार करण्याची गरज आहे. कारण ९० च्या दशकातील मोजक्याच अभिनेत्री असतील ज्या आजही लीड रोलमध्ये बघावयास मिळत आहेत. करिना कपूर, काजोल यांसारख्या अभिनेत्रींना समोर ठेवून काही निर्माते आजही कथा लिहित आहेत. तर बºयाचशा अभिनेत्री घरी बसून आहेत. त्या तुलनेत अभिनेत्यांचा विचार केल्यास, बहुतांश अभिनेते आजही इंडस्ट्रीमध्ये टिकून आहेत. रविना आणि अजय यांच्यातील वाद काही नवा नाही, त्यामुळे दोघांच्या परस्परविरोधी प्रतिक्रिया बरेच काही सांगून जात आहे.