मुलासमोर सिगारेट ओढताना दिसला अजय देवगण; ट्रोलर्सनी वडिलांच्या कर्तव्याची करून दिली जाणीव!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 3:29 PM
मुलासमोर सिगारेट ओढतानाचा फोटो शेअर करणाºया अजय देवगणला ट्रोलर्सनी चांगलेच खडेबोल सुनावले. वडिलांच्या कर्तव्याची जाणीव करून देताना त्याच्यावर टीका केली.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने २ एप्रिल रोजी आपला ४९वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त तो आपल्या परिवारासमवेत पॅरिस येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. त्याने त्याच्या या व्हेकेशनचे अन् बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटोज्ही सोशल मीडियावर शेअर केले. त्यातील एका फोटोमध्ये तो त्याच्या सात वर्षाच्या मुलासोबत दिसत आहे. सध्या तो मुलगा युगसोबतच्या याच फोटोवरून सर्वत्र ट्रोल होत आहे. या फोटोमध्ये अजय एका हाताने मुलाला जवळ करताना दिसत आहे, तर त्याच्या दुसºया हातात सिगारेट दिसत आहे. नेमकी हिच बाब ट्रोर्ल्सला खटकली असून, त्याच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठविली जात आहे. एका युजरने त्याच्यावर टीकात्मक प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘सर, मुलांसमोर स्मोकिंग करणे ही बाब चांगली नाही’, दुसºया एका युजरने लिहिले, ‘सर तुमच्या हातात सिगारेट दिसत आहे, तुम्ही आमच्यासारख्या तरुणांसमोर रोल मॉडेल आहात, मुलासमोर सिगारेट ओढणे शक्यतो टाळा.’ तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘ही सिगारेट आहे काय? भाई तसे असेल तर मला माफ करा, कारण ज्युनिअर बच्चनसमोर सिगारेट ओढणे चांगली बाब नाही.’ मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००८ मध्ये जेव्हा काजोलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा ती अजयच्या स्मोकिंगच्या सवयीमुळे खूपच त्रस्त झाली होती. त्यानंतर तिने अजयला स्मोकिंग सोडण्यासाठी तगादा लावला होता. मात्र या फोटोवरून अजय अजूनही आपली स्मोकिंगची सवय सोडू शकला नाही. अजय सध्या त्याच्या ‘रेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कारण त्याच्या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई केली असून, शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्यासाठी काही पावलेच दूर आहे. अजयचा हा चित्रपट १९८० मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. दरम्यान, १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया अजयने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याने आतापर्यंत ‘दिलवाले, जान, जिगर, बादशाहो, कयामत, कच्चे धागे, गोलमाल अगेन, गोलमाल, सुहाग’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.