Join us  

Maidaan Teaser : डोळ्यात पाणी अन् मनात जिद्द...! पाहा, अजय देवगणच्या 'मैदान' जबरदस्त टीझर  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 2:36 PM

Ajay Devgn Starrer Film Maidaan Teaser : होय, भोला या सिनेमानंतर अजयचा 'मैदान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि याचा टीझर रिलीज झालाये.

 Ajay Devgn Starrer Film Maidaan Teaser :  अजय देवगणने 'भोला' या सिनेमाच्या रिलीजसोबतच चाहत्यांना एक डबल ट्रीट दिली. होय, 'भोला' रिलीज झाला आणि 'भोला'सोबत अजयने 'मैदान' या त्याच्या नव्या सिनेमाचा टीझर रिलीज केला. होय, भोला या सिनेमानंतर अजयचा 'मैदान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि याचा टीझर रिलीज झालाये.

'मैदान'च्या टीझरला पब्लिकचा शानदार प्रतिसाद मिळतोय. १ मिनिट ३० सेकंदाच्या या टीझरमध्ये अजय देवगण लक्ष वेधून घेतो. फुटबॉल कोच बनलेला अजयचा लुकही जबरदस्त आहे. मॅचच्या अखेरच्या क्षणी असलेलं प्रेशर, इमोशन्स त्याने अगदी बारकाईने दाखवलं आहे.इंडिया विरूद्ध युगोस्लावियाची मॅच सुरू आहे. पण धुवाधार पाऊस कोसळतोय. संपूर्ण मैदान पाण्याने भरलंय. हा थरार पाहण्यासारखा आहे. आज मैदान में उतरना 11, लेकिन दिखना 1... हा अजयच्या तोंडचा संवाद ऐकून अंगावर शहारा येतो.

मैदान या चित्रपटात भारतीय फूटबॉलसाठीचा सुर्वणकाळ दाखवण्यात येणार आहे. ऑलंपिक स्पर्धेत भारताने फुटबॉलमध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठीचा संघर्ष चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सिनेमा एका सत्यघटनेवर आधािरत आहे. सिनेमात अजयने  फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारली आहे. सैय्यद अब्दुल रहीम यांना रहीम साहब म्हणून ओळखलं जायचं. ते एक प्रोफेशनल फुलबॉलपटू होते. नंतर भारतीय फुटबॉल टीमचे कोच बनले. त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल टीमने १९६२ साली एशियन गेम्स जकार्तामध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं.मैदान या चित्रपटाचं  दिग्दर्शन अमित रविंद्र शर्मा यांनी केले आहे. तर निर्मिती बोनी कपूर यांची आहे. या चित्रपटाला एआर रहमान यांनी संगीत दिलं आहे. मैदान हा चित्रपट २३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूड