Join us  

दोन दिवसांवर रिलीज असताना अजय देवगण-तब्बूचा 'औरो में कहा दम था' सिनेमाचं प्रदर्शन लांबलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 11:09 AM

अजय देवगण आणि तब्बू यांच्या आगामी 'औरो में दम कहा था' सिनेमाचीरिलीज डेट ढकलली. निर्माते म्हणतात... (ajay devgn, tabu, auron mein kaha dum tha)

अजय देवगण-तब्बू यांच्या आगामी सिनेमाची सध्या चांगली चर्चा होती. 'औरो में कहा दम था' असं या सिनेमाचं नाव आहे. काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सिनेमाच्या टिझर, ट्रेलरने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. 'औरो में कहा दम था' सिनेमात अजय देवगण आणि तब्बू रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहेत. सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता होती. पण अशातच दोन दिवसांवर रिलीज होत असतानाच 'औरो में कहा दम था'चं प्रदर्शन थांबवण्यात आलंय. 

'औरो में कहा दम था'चं प्रदर्शन थांबवलं. निर्माते म्हणतात..

'औरो में कहा दम था' सिनेमा ५ जुलैला रिलीज होणार होता. दोन दिवसांवर रिलीज असताना सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात आलंय. याविषयी सिनेमाच्या टीमने एक खास पोस्ट शेअर करुन याविषयी खुलासा केलाय. निर्माते म्हणतात, "'प्रिय मित्रांनो प्रदर्शक आणि वितरक यांनी केलेल्या विनंतीवरून, आम्ही एकत्रितपणे आमच्या 'और में कहां दम था' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रिलीजची तारीख लवकरच जाहीर केली जाईल." त्यामुळे अजय आणि तब्बूचा हा दहावा एकत्रित चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

'औरो में कहा दम था' सिनेमाविषयी..

'बेबी', 'स्पेशल 26' अशा स्पाय थ्रिलर सिनेमांचं दिग्दर्शन करणारे नीरज पांडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. यानिमित्ताने नीरज पहिल्यांदाच रोमँटिक सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. 'औरो में कहा दम था'  सिनेमात अजय देवगण - तब्बू प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेता जिमी शेरगिल, सई मांजरेकरही विशेष भूमिकेत बघायला मिळत आहेत. ५ जुलै २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. आता सिनेमाच्या नव्या रिलीज डेटची सर्वांना उत्सुकता आहे

टॅग्स :अजय देवगणतब्बूबॉलिवूड