सध्या अजय देवगण दृश्यम 2 चित्रपटाच्या यशाचा आनंद घेतो आहे.. वर्ष संपण्यापूर्वी अजयने चित्रपट रसिकांना एक मोठी ट्रीट दिली आहे. दृश्यम 2 हिट झाला, आता अजय देवगण कामावर परतला आहे. त्याने त्याच्या नवीन चित्रपटावर काम सुरू केले आहे. ज्याच्या शूटिंगसाठी तो वाराणसीला पोहोचला.
वाराणसीला पोहोचल्यावर अजय देवगण सर्वात आधी चेत सिंह घाट येथील शूटिंग स्पॉटवर गेला. सायंकाळपूर्वी अजय देवगणने काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गंगेच्या लाटांवर स्वार होऊन अजय बोटीने गंगा घाटाच्या काठी काशी विश्वनाथच्या गंगद्वारला गेला आणि बाबा विश्वनाथांचे विधिवत दर्शन व पूजा केली. दर्शनाहून परतत असताना अजयच्या चाहत्यांनी त्याला घेरले.
अजय म्हणाला हर हर महादेवअजय देवगणला विचारण्यात आले की, मंदिरात आल्यानंतर कसे वाटले?, यावर अभिनेता म्हणाला, जसं सगळ्यांना वाटतं तसंच वाटतंय. अजय देवगणने हर हर महादेव म्हटलं. यानंतर अजय देवगण काशी विश्वनाथच्या गंगद्वारहून गंगा घाटातून बोटीने परतला. अजय देवगणच्या या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये अजय देवगणने कपाळावर चंदन आणि हात जोडताना दिसत होता. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरत दिसत होते. प्रत्येकजण अजय देवगणला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात घेण्यासाठी उत्सुक होतं. अजय देवगण कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बनारसमध्ये पोहोचला होता, याबाबत आता कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दृश्यम २ने केली जबरदस्त कमाई गेल्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आणि सातच दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. ‘दृश्यम 2’बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. दृश्यम 2’ने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा गल्ला जमवलेला पाहून बॉलिवूडकर खुश्श आहेत.‘दृश्यम 2’ एका मल्याळम सिनेमाचा हा रिमेक आहे. मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. अजय देवगणसह ‘दृश्यम 2’मध्ये तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.