अजय देवगण (ajay devgn) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अजयला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अजय देवगणने कधी सिनेमांमधून कॉमेडी केली, कधी अॅक्शन तर गंभीर भूमिका. अजय देवगणच्या प्रत्येक सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांमध्ये एक वेगळेपणा जाणवतो. अजय देवगणने आजवर संजय लीला भन्साली, रोहित शेट्टी, विशाल भारद्वाज अशा दिग्दर्शकांसोबत काम केलं. अजयच्या करिअरमध्येही असाही एक दिग्दर्शक आहे ज्याच्यासोबत अजयने एक सिनेमा केल्यानंतर आजवर तब्बल १८ वर्ष तो त्याच्याशी बोलला नाही. कोण आहे हा दिग्दर्शक?
या दिग्दर्शकाशी अजयने १८ वर्ष धरलाय अबोला
अजय देवगणने ज्या दिग्दर्शकाशी अबोला धरला त्याचं नाव आहे अनुभव सिन्हा. (anubhav sinha) 'रा.वन', 'मुल्क', 'थप्पड' अशा संवेदनशील आणि सुपरहिट बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलं. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अनुभव म्हणाले की, "माझं अजयचं कधीही भांडण झालं नाही. पण ते माझ्याशी बोलत नाही. मला याचं कारण माहित नाही. आम्ही दोघांनी एकत्र कॅश सिनेमासाठी काम केलं. तो मला टाळतोय असंही मी म्हणू शकत नाही. कदाचित मी या गोष्टीचा जास्त विचार करत असेल. पण मी अनेकदा अजय यांना मॅसेज केलाय. परंतु त्यांनी कधी मॅसेजला उत्तर दिलं नाही."
"कदाचित ते मॅसेजला रिप्लाय करायला विसरले असतील. पण गेली १८ वर्ष आम्ही एकमेकांशी बोललो नाहीये. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. निर्माते आणि फायनान्सर यांच्यातील काही मतभेद असतात. परंतु आमच्यात असं काही नाही. कोणत्या गाण्यावरुनही कसलाही वाद नाही. अजय माझा आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो यारो का यार आहे. अजय असा माणूस आहे जो मित्रांची गरज असेल तर पहिला धावून जातो." अशा शब्दात अनुभव सिन्हांनी अजय देवगणबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. अनुभव सिन्हांशी अजय का बोलत नाही, याचं कारण अभिनेत्यालाच ठाऊक!