Join us

अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:49 IST

'छावा' सिनेमात अजय देवगण एका खास भूमिकेत दिसणार आहे. कोणती आहे ही भूमिका? जाणून घ्या (chhaava, ajay devgn)

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगली उत्सुकता आहे. उद्या १४ फेब्रवारीला 'छावा' सिनेमा सगळीकडे रिलीज होतोय. विकी कौशलने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 'छावा'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज आहे. अशातच 'छावा' सिनेमासंबंधी एक मोठी अपडेट समोर येतेय ती म्हणजे 'छावा' सिनेमात अजय देवगण (ajay devgn) एका खास भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. आता ही भूमिका नेमकी कोणती? जाणून घ्या.

'छावा'मध्ये अजय देवगणची खास भूमिका 

पिंकविलाने केलेल्या रिपोर्टनुसार, 'छावा' सिनेमात अजय देवगण एका खास भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तुम्हाला वाटलं असेल की, अजय देवगण कोणत्या ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार तर असं काही नाही. 'छावा' सिनेमासाठी अजय देवगण नरेशन करणार आहे. म्हणजेच सिनेमात बॅकग्राऊंडला अजयचा आवाज ऐकायला मिळेल. अजय सिनेमात नरेटर म्हणून भूमिका निभावताना दिसणार आहे. अशाप्रकारे अजयच्या दमदार आवाजात 'छावा'ची कथा आपल्यासमोर उलगडत जाईल.

'छावा' सिनेमात कलाकारांची फौज

'छावा' सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना पाहायला मिळणार आहे. याशिवाय मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये 'छावा' सिनेमात दिसणार आहेत. अभिनेत्री नीलकांती पाटेकर सिनेमात धाराऊची भूमिका साकारताना दिसणार आहेत. जगभरातील तमाम शिवप्रेमींना 'छावा' सिनेमाची उत्सुकता आहे.

 

टॅग्स :अजय देवगण'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्ना