Join us

किच्चा सुदीपच्या स्पष्टीकरणावर अजय देवगणचा शेवटचा रिप्लाय, हिंदी भाषेवरून पेटला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 7:00 PM

Ajay Devgn responded to Kiccha Sudeep's Tweet : अभिनेता सुदीप किच्चा याच्या हिंदी भाषेवरील वक्तव्यावरून बॉलिवूड अभिनेता अजय देवगन त्याच्यावर सोशल मीडियावर भडकला होता.

 Ajay Devgn responded to Kiccha Sudeep's Tweet : साऊथ सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) याच्या हिंदी भाषेवरील वक्तव्यावरून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्यावर सोशल मीडियावर भडकला होता. अजयने ट्विट करून सुदीपची कानउघडणी केली होती. नंतर त्यावर सुदीपने अजयला रिप्लाय करत वक्तव्य कसं होतं हे सांगितलं. आता अजयने त्याला रिप्लाय दिला आहे. 

‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही’, असं किच्चा एका इव्हेंटमध्ये कथितपणे म्हणाला होता आणि त्याच्या याच वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं होतं. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनं (Ajay Devgn) या वक्तव्यानंतर किच्चाला परखड उत्तर दिलं आहे.

अजय देवगणने किच्चा सुदीपला टॅग करत ट्विट केलं की, ‘किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुझ्या मतानुसार, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाहीये तर मग तू तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी आमची मातृभाषा व राष्ट्रभाषा होती व नेहमी राहील...’, असं अजय देवगणने म्हटलं आहे. यावर किच्चा सुदीपने स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर अजय देवगणने रिप्लाय दिला.

अजयने रिप्लाय दिला की, 'किच्चा सुदीप तू चांगला मित्र आहेस. गैरसमज दूर करण्यासाठी धन्यवाद. मी नेहमीच फिल्म इंडस्ट्रील एकत्रच बघितलं आहे. आपण सर्व भाषांचा सन्मान केला पाहिजे आणि आपल्या भाषेचा सन्मान करणं सर्वांना सांगितलं पाहिजे. पण काहीतरी चुकीची माहिती समोर आली आहे'.

किच्चा दिलं होतं अजयला उत्तर 

अजयच्या या ट्विटला किच्चाने उत्तर दिलं आहे. ‘हॅलो, अजय देवगण सर,... मी ते वाक्य ज्या संदर्भाने बोललो, तो संदर्भ कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. मी प्रत्यक्षात भेटल्यावर ते कदाचित तुम्हाला पटवून देईल. माझं ते विधान कोणाच्याही भावना दुखावण्याच्या किंवा यावरून वाद निर्माण करण्याचा उद्देशाने नव्हतं. मी असं का करू सर? तुझं हिंदीतील ट्विटचा अर्थ मला कळला, कारण मी हिंदीचा आदर करतो. या भाषेवर आपलं प्रेम आहे. मी भारतातील प्रत्येक भाषेवर प्रेम करतो. मी हा मुद्दा आणखी ताणू इच्छित नाही. मी ते पूर्णत: वेगळ्या संदर्भाने बोललो होतो. लवकरच भेटू ही अपेक्षा,’ असं म्हणत किच्चा सुदीपने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणाला होता किच्चा सुदीप?

किच्चा सुदीपने एका चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्याने दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिलं  होतं. ‘दाक्षिणात्य दिग्दर्शक सध्या अशा चित्रपटांची निर्मिती करत आहे ज्याचे जागतिक स्तरावर अस्तित्व असेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक निर्माते हे तेलुगू आणि तमिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हे तितकं यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत’, असं दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप म्हणाला होता. 

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूडTollywood