अजय देवगणच्या चित्रपटात बॉलिवूडच्या 90च्या दशकातील ही जोडी दिसणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 6:07 AM
बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या जोडीला सगळ्यात जास्त लोकप्रिय होती. अनिल कपूर आणि माधुरीची ...
बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या जोडीला सगळ्यात जास्त लोकप्रिय होती. अनिल कपूर आणि माधुरीची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. दोघे जण धमाल सिरीजच्या तिसऱ्या टोटल धमाल सिरीज चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण करणार आहे. या चित्रपटाच्या पहिला दोन सिरीजचा भाग संजय दत्त होता. मात्र आता तो या चित्रपटात नसणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार अजय देवगण आणि इंद कुमार मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. अजयने याच्या आधी मस्तीमध्ये काम केले आहे. टोटल धमाल डिसेंबर 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी एक इंटरव्ह्रु दरम्यान माधुरीने सांगितले होते की हे खरं आहे की खूप वेळानंतर मी इंदर कुमार सोबत काम करणार आहे. या चित्रपट अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुढे ती म्हणाली गेल्या काही वर्षांमध्ये मी कॉमेडी चित्रपटा काम केले नाही आहे. त्यामुळे या चित्रपटात काम करणे माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव असणार आहे. 2000 मध्ये पुकार या चित्रपटात माधुरी आणि अनिल कपूरने शेवटचे एकत्र काम केले होते. माधुरीने जवळपास दोन वर्ष बॉलिवूडवर राज्य केले. त्याची जोडी अनिल कपूर, संजय दत्त, सलमान खान आणि शाहरुख खान बरोबर पसंत केली गेली. ALSO RAED : अनिल कपूरने आपल्या यशाचे श्रेय दिले या अभिनेत्रीलाटोटल धमालमध्ये माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरशिवाय अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि जावेद जाफरीसुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाचे आधीचे दोन भाग हिट गेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इंदर कुमार या चित्रपटाच्या तिसऱ्या भाग बनवायाच्या तयारीत आहे. इंदर कुमार आणि अनिल कपूरच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनिल कपूरसोबतच राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. फन्ने खां मध्ये अनिल कपूर आणि ऐश्वर्या रायची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.