यामी गौतम(Yami Gautam)चा 'आर्टिकल ३७०' (Article 370) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या १० दिवसांत या चित्रपटाने बजेटपेक्षा तिप्पट कमाई केली आहे. आता अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R. Madhvan) स्टारर 'शैतान' (Shaitan Movie) देखील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या हॉरर थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्यात चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे. पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'शैतान'ने आतापर्यंत किती कलेक्शन केले आहे हे जाणून घेऊयात.
शैतानचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. यापूर्वी, चित्रपटासाठी प्री-तिकीट बुकिंग मर्यादित ठिकाणी सुरू करण्यात आले होते, परंतु अलिकडे ऑनलाइन तिकीट-बुकिंग प्लॅटफॉर्मवर आणखी काही शो जोडले गेले आहेत. पहिल्या दिवसाच्या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडेही आले आहेत. SACNILC च्या रिपोर्ट नुसार, पहिल्या दिवशी देशभरात 'शैतान'ची १५ हजार १४५ तिकिटे हिंदीमध्ये 2D स्वरूपात बुक करण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटाने ३७.४१ लाख रुपये कमवले आहेत. सध्या चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून पाच दिवस बाकी असून या काळात आगाऊ बुकिंगमध्ये 'शैतान' चांगला कलेक्शन करेल अशी अपेक्षा आहे.
'शैतान'च्या ट्रेलरला मिळतोय चांगला प्रतिसादनुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 'दृश्यम २' च्या सुपर यशानंतर अजय देवगणने पुन्हा एकदा 'शैतान'मध्ये फॅमिली मॅनच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे, तर आर माधवनने भयंकर खलनायकाच्या भूमिकेत प्रसिद्धी मिळवली आहे. एकूणच, ट्रेलरनंतर या चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगली आहे.
'शैतान'मध्ये झळकणार हे कलाकार‘शैतान’चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. याआधी बहलने 'क्वीन' आणि 'सुपर ३०' सारखे चित्रपटही दिग्दर्शित केले होते. 'शैतान'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर अजय देवगण आणि आर माधवन व्यतिरिक्त या चित्रपटात ज्योतिका, जानकी बोडीवाला आणि अंगद राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओ, पॅनोरमा स्टुडिओ आणि देवगण फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे. हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होत आहे.