अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर जगभरात नाव कमावलं. नुकतेच अजय देवगणच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमाला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. १० जानेवारी २०२० रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या खास प्रसंगी अजयने चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अजय देवगणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
अजयने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. यात पाठमोरा अजय तान्हाजी रुपात दिसत आहे आणि सिनेमातील डॉयलॉग ऐकायला येत आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'तान्हाजी सिनेमाच्या सेटवर शिकलेले धडे आणि आठवणींनी माझ्या आतल्या मावळ्याला जागवलं. माय भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्ती मला आजही खऱ्या आयुष्यात कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तान्हाजी बनण्याची ताकद देते'. या पोस्टवर चाहत्यांनी अजयचे कौतुक केलं आहे.
'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमातून सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते. तर याक अजय देवगणसह सैफ अली खान, शरद केळकर, काजोल आणि नेहा शर्मा सारखे स्टार्सही दिसले होते. 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या सिनेमातील भुमिकेसाठी अजयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. क्स ऑफिसवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.