Join us

तान्हाजी मोडणार या प्रसिद्ध चित्रपटाचा रेकॉर्ड, जाणून घ्या या चित्रपटाच्या रेकॉर्डतोड कलेक्शनविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 4:21 PM

कमाईच्या बाबतीत तान्हाजी : द अनसंग वॉरियर या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

ठळक मुद्देकबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर 276.34 इतकी कमाई केली होती. आता तानजीने 260 कोटीचा टप्पा पार केला असून कबीर सिंगला मागे टाकण्यासाठी या चित्रपटाला केवळ 9.46 कोटींचा गल्ला जमवण्याची गरज आहे.

तान्हाजी : द अनसंग वॉरियर या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. हेच कारण आहे की, अनेक चित्रपटांचे आव्हान असूनही अजूनही या चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. अलीकडे रिलीज झालेले स्ट्रीट डान्सर, पंगा, जवानी जानेमन, मलंग हे सिनेमेही तान्हाजीची घोडदौड थांबवू शकले नाहीत. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत या चित्रपटाने एकापाठोपाठ एक नवनवे विक्रम रचण्याचा धडाका लावला आहे. कमाईच्या बाबतीत तान्हाजीने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. आता लवकरच हा चित्रपट कबीर सिंग या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्डही लवकरच मोडणार आहे.

शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता तान्हाजी कबीर सिंगला देखील मागे टाकणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर 276.34 इतकी कमाई केली होती. आता तानजीने 260 कोटीचा टप्पा पार केला असून कबीर सिंगला मागे टाकण्यासाठी या चित्रपटाला केवळ 9.46 कोटींचा गल्ला जमवण्याची गरज आहे. त्यामुळे तान्हाजी आता कबीर सिंगला देखील मागे टाकेल यात काहीच शंका नाही.

तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा चित्रपट अजय देवगणचा 100 वा चित्रपट आहे. अजयने यात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. 

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. काजोल, अजय देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि सैफ अली खान या महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण त्याचसोबत छोट्या छोट्या भूमिकेत असलेले कलाकार देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

टॅग्स :तानाजीकबीर सिंग