Join us

Ajmer 92 : 'केरळ स्टोरी' नंतर 'अजमेर 92' चित्रपटही वादात, मुस्लिम संघटनेने केली बंदीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 3:06 PM

३० वर्षांपूर्वी अजमेरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचारावर फिल्म आधारित आहे.

'द केरळ स्टोरी' चा वाद थंड होतो ना होतो तोच आता आणखी एक सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पुढील महिन्यात रिलीज होणारी फिल्म 'अजमेर 92' (Ajmer 92) वर एका मुस्लीम संघटनेने बंदीची मागणी केली आहे. ही फिल्म अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ३० वर्षांपूर्वी अजमेरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. तर फिल्मच्या कंटेंटवर आक्षेप घेत 'जमीयत उलमा ए हिंद' ने 'अजमेर 92' विरोधात मोर्चा काढला आहे. तसंच चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे.

जमीयतचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी म्हणाले, "अजमेर शरीफच्या दर्ग्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी ही फिल्म बनवण्यात आली आहे. यावर निर्बंध घाला. अपराधात्मक घटनांचा संबंध धर्माशी जोडण्याऐवजी त्याविरोधात एकजूट होऊन कारवाई करण्याची गरज आहे. ही फिल्म समाजात तेढ पसरवणारी आहे."

अजमेर 92 चे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह यांनी केले आहेत. सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. जरीना वहाब , सयाजी शिंदे, मनोज जोशी आणि राजेश शर्मा यांची सिनेमात महत्वाची भूमिका आहे. ही सत्यघटनेवर आधारित स्टोरी असल्याचं सांगण्यात येतंय. यामध्ये अजमेरमध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी १०० पेक्षा जास्त मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली होती. हीच कथा दाखवण्यात आली आहे. पिडितांमध्ये शाळेतील मुली होत्या आणि कित्येक मुलींनी नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फिल्मच्या कंटेंटवरुनच सध्या वाद सुरु झाला आहे. 

टॅग्स :सिनेमाअजमेरलैंगिक छळ