Join us

OMG!  रागाच्या भरात अनुराग कश्यपने चक्क अनिल कपूरच्या तोंडावर फेकलं पाणी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 15:21 IST

Ak Vs Ak : विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देसिनेमात अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात दोघेही बापलेकीची भूमिका साकारताना दिसतील.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर व दिग्दर्शक अनुराग कश्यप एकमेकांशी टिष्ट्वटरवर भांडले. अगदी एकमेकांबद्दल नको ते बोलले. अशात अनिल कपूरने अनुरागला ‘सबसे बडा फ्रॉड’ म्हटले अन् अनुरागला भडकला. इतका की, संतापाच्या भरात त्याने चक्क अनिलच्या तोंडावर पाणी फेकले. सध्या ‘एके विरूद्ध एके’ यांच्यात सुरु असलेल्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अर्थात या भांडणात काहीही सत्यता नाही. हे भांडण दुसरे तिसरे काही नसून निव्वळ एक प्रमोशनल स्टंट आहे.होय, अनिल व अनुरागचा ‘Ak Vs Ak’ हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमध्येही अनिल व अनुराग एकमेकांशी भांडताना दिसतात.  

ट्रेलरची सुरुवात होते तेव्हा दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात आणि गप्पा मारता मारता एकमेकांशी भिडतात. आता हा प्रसंग चित्रपटातील आहे की प्रत्यक्षात घडलाय, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे..रिपोर्टनुसार, या सिनेमात अनुराग कश्यप अनिल कपूरच्या मुलीला किडनॅप करेल आणि यामुळे दोघेही एकमेकांशी भिडतील. याच सिनेमाची झलक दोघांनी रविवारी टिष्ट्वटरवर दाखवली  होती. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनिल व अनुराग टिष्ट्वटरवर एकमेकांशी भिडले. ‘सेक्रेड गेम्स’ फेम विक्रमादित्य मोटवानी हा सिनेमा दिग्दर्शित करतोय.  

सिनेमात अनुराग सोनमचे अपहरण करतो. आपल्या मुलीला शोधण्यासाठी अनिलकडे फक्त 10 तास असतात. याच 10 तासांचा ड्रामा सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 24 तारखेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय.

म्हणे, तुझी गाडी खटारा...! कंगना-दिलजीतनंतर अनिल कपूर-अनुराग कश्यपमध्ये जुंपली

AK vs AK ! अनिल कपूर व अनुराग कश्यप ट्विटरवर का भांडले? कारण ऐकून व्हाल थक्क

टॅग्स :अनिल कपूरअनुराग कश्यप