Join us

आकाश अंबानीच्या संगीत सेरेमनीमधील आमिर खानचा डान्स तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 16:34 IST

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची संगीत सेरेमनी स्विर्झलँडमध्ये नुकतीच झाली असून या समारंभाला देश-विदेशातील अनेक सेलिब्रेटी हजर होते आणि त्यांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर केले.

ठळक मुद्देकोल्ड प्ले आणि द चेनस्मोकर्स यांच्या टीमने देखील परफॉर्मन्स सादर केला. क्रिस मार्टिन आणि चेनस्मोकर्स यांनी परफॉर्म सादर करताच आकाश आणि श्लोका देखील त्यांच्यासोबत थिरकले.आमिर खानने या संगीत सेरेमनीमध्ये त्याच्या आती क्या खंडाळा या प्रसिद्ध गाण्यावर जोरदार परफॉर्मन्स सादर केला. त्यानंतर अंबानी कुटुंबियातील सगळ्यांनी आणि बॉलिवूड स्टार्सने मिळून दिल धडकने दो या चित्रपटातील गल्लन गुडीयाँ हे या गाण्यावर ताल धरला. 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता या दोघांचा साखरपुडा गेल्या वर्षी ३० जूनला झाला होता. श्लोका मेहता ही आकाशची बालमैत्रीण असून त्या दोघांचे शिक्षण धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र झाले आहे. श्लोका ही रसेल मेहता या डायमंड उद्योजकाची मुलगी आहे. या दोघांच्या साखरपुड्याआधी मेहंदी, मग प्री- एंजेगमेंट पार्टी पार पडली. यानंतर अंबानींच्या एंटिलियामध्ये अगदी थाटामाटात, धुमधडाक्यात साखरपुडा झाला होता. आता या दोघांचे लवकरच लग्न होणार असून सध्या लग्नापूर्वीचे समारंभ होत आहेत. 

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची संगीत सेरेमनी स्विर्झलँडमध्ये नुकतीच झाली असून या समारंभाला देश-विदेशातील अनेक सेलिब्रेटी हजर होते आणि त्यांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर केले. कोल्ड प्ले आणि द चेनस्मोकर्स यांच्या टीमने देखील परफॉर्मन्स सादर केला. क्रिस मार्टिन आणि चेनस्मोकर्स यांनी परफॉर्म सादर करताच आकाश आणि श्लोका देखील त्यांच्यासोबत थिरकले. 

अभिनेता आदर जैनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिमध्ये मार्टिन कोल्ड प्लेचे स्काय फुल ऑफ स्टार्स हे त्याचे प्रसिद्ध गाणे सादर करत असल्याचे देखील दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अमेरिकन डीजे, द चेनस्मोकर्स यांच्यासोबत रणबीर कपूर आणि अलिया भट देखील डान्स करताना दिसत आहेत. 

आमिर खानने या संगीत सेरेमनीमध्ये त्याच्या आती क्या खंडाळा या प्रसिद्ध गाण्यावर जोरदार परफॉर्मन्स सादर केला. त्यानंतर अंबानी कुटुंबियातील सगळ्यांनी आणि बॉलिवूड स्टार्सने मिळून दिल धडकने दो या चित्रपटातील गल्लन गुडीयाँ हे या गाण्यावर ताल धरला. 

शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर, अलिया भट, करण जोहर, अर्जुन कपूर, मलाईका अरोरा, करिश्मा कपूर, विद्या बालन, जॅकलिन फर्नांडिस हे बॉलिवूडमधील सेलिब्रेटी तर सचिन तेंडुलकर, जहीर खान, हरभजन सिंग, युवराज सिंग, यांसारखे क्रिकेटर संगीत सेरेमनीसाठी सध्या स्विर्झलँडमध्ये आहेत. 

स्विर्झलँडमधील एका वेबसाईटनुसार एकूण ८५० लोकांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या सुरक्षततेसाठी २०० सिक्युरीटी गार्ड तैनात करण्यात आले आहेत.  

टॅग्स :आकाश अंबानीआकाश अंबानी लग्न