सोशल मीडियावर फेक न्यूज पेरून लाखो रूपये कमावणा-या एका यु-ट्युबरला अक्षय कुमारने जोरदार दणका देत त्याच्यावर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. राशिद सिद्दीकी असे युट्यूबरचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी राशिदीला बिहारमधून अटक केली.‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, राशिद सिद्दीकी नावाच्या या युट्यूबरने सुशांतच्या आत्महत्येनंतर अगदी वाहत्या गंगेत हात धुवून घेत अनेक खोट्या बातम्या पोस्ट केल्या. ऐकीव माहितीवर आधारित असलेल्या या फेक न्यूजमध्ये त्याने अनेक बड्या बड्या सेलिब्रिटींची नावे घेतलीत. अक्षय कुमार त्यापैकीच एक. यातून त्याने 15 लाख रूपये कमावले.
अक्षयबद्दल दिली होती ही फेक न्यूजराशिद सिद्दीकीने सुशांत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात त्याने अक्षयवर अनेक आरोप केले होते. ‘एमएस धोनी’ हा सिनेमा सुशांतला मिळाल्याने अक्षय त्याच्यावर नाराज होता. सुशांतच्या निधनानंतर अक्षयने रिया चक्रवर्तीला कॅनडात पळून जाण्यात मदत केली, असे अनेक खोटे दावे त्याने आपल्या या व्हिडीओत केले होते. सुशांत प्रकरणी अक्षय कुमार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आहे, असा दावाही त्याने केला होता. आता याच फेक दाव्याप्रकरणी अक्षयने राशिदवर 500 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
चार महिन्यांत कमावले 15 लाखआश्चर्य वाटेल पण फेक पोस्ट शेअर करून राशिद सिद्दीकी नावाच्या या युट्यूबरने चार महिन्यात 15 लाख रूपये कमावले.25 वर्षीय राशिद बिहारचा असून, तो युट्यूबवर एफएफन्युज नावाचे चॅनेल चालवतो. पेशाने तो इंजिनिअर आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर सुशांतच्या मृत्यू संबंधी बातम्या टाकून सिद्दीकीने 6.5 लाख रुपयांची कमाई केली. सिद्दीकीकडे सुशांतच्या मृत्यूपूर्वी दोन लाख सबस्क्राइब होते, नंतर ते वाढून 3.70 लाख झाले.