ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्ना स्टारर 'ताल' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून हे दोन्ही कलाकार चाहत्यांच्या पसंतीस उतरले. ताल हा डान्स आणि सुरेख गाण्यांनी परिपूर्ण चित्रपट होता, चित्रपटात मानसीच्या भूमिकेत ऐश्वर्या राय खूपच सुंदर दिसत होती. त्याचवेळी अभिनेता अक्षय खन्ना मानवच्या भूमिकेत झळकले होते.दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रचंड भावली होती. त्याचवेळी, 1997 मध्ये अक्षय कुमार पूजा भट्टसोबत 'बॉर्डर' या देशभक्तीपर चित्रपटात दिसला होता. अक्षय खन्नाने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
कालांतराने चित्रपटांमधून गायब झाला. आता तो पूर्वासारखा चार्मिंगही दिसत नाही. त्याचा लूक पूर्ण बदलला आहे.अतिशय देखणा दिसणाऱ्या अभिनेता आजारी आहे की काय अशी चिंता चाहत्यांना सतावत आहे. अक्षयला ९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून पाहिले जात होते आणि त्याच्या लूकमुळे त्याने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.
'बॉर्डर' नंतर, 'ताल' , 'दिल चाहता है', 'गांधी माय फादर', 'हमराज' आणि 'हंगामा' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला.तो बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. अक्षय खन्नाने 90 आणि 2000 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि अनेक मोठ्या हिरोइन्सचा तो हिरो म्हणून झळकला होता. अक्षय खन्नाला 'दिल चाहता है' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, मात्र त्यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली.
2016 मध्ये आलेल्या 'ढिशूम' चित्रपटाद्वारे पुनरागमन केले होते.अक्षय खन्नाचे खासगी आयुष्यही सुरळीत नाही. त्याचं नाव काही अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं होतं, पण आजपर्यंत त्यांने लग्न केलं नाही. लग्नानंतर वाढणाऱ्या जबाबदारी उलण्यासाठी तो मानसिक तयारी नसल्यामुळे तो अविवाहीत असल्याचे अक्षयने सांगितले होते. इतकंच काय तर रुपेरी पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अक्षयचं नाव अद्याप कुठल्याही अभिनेत्रीसोबत जोडलं गेलेलं नाही.अक्षयने OTT वर पदार्पण केले होते. 'जी 5' पर स्टेट ऑफ सीज- टेंपल अटैक' मध्ये झळकला होता.