अक्षय कुमार 2021 मध्ये कमाईचा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज, रिलीज होणार 'हे' 6 सिनेमे
By गीतांजली | Published: December 15, 2020 06:30 PM2020-12-15T18:30:00+5:302020-12-15T18:55:16+5:30
'सूर्यवंशी'कडून मोठ्या अपेक्षा आहेत.
कोविड 19मुळे यावर्षी बॉलिवूडचे क्वचितच सिनेमा थिएटरपर्यंत पोहोचले. डिजीटल प्लटफॉर्मवर सिनेमा रिलीज होत असल्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरकडे सध्या पाठ वळवली आहे. यामुळे अनेक स्टार्स आणि निर्मात्यांनी त्यांचे मोठे चित्रपट थांबवले आहेत. गेल्या काही वर्षांपासून वर्षाला अनेक सिनेमा देणार्या अक्षय कुमारचा यावर्षी एकच सिनेमा आला. पण 2021 मध्ये अक्षय बॉक्स ऑफिसवर धमाका करायला तयार आहे. अक्षयकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत.
अखेर सिल्वर स्क्रिनवर येणार सूर्यवंशी
अक्षय कुमारचा सर्वात मोठा सिनेमा 'सूर्यवंशी' यंदा रिलीज होऊ शकला नाही. हा सिनेमा आता 2021 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिका दिसणार असून या सिनेमाची निर्मिती रोहित शेट्टीने केली आहे. हा एक मोठा बिगबजेट सिनेमा, जो निर्मात्यांनी थांबवला आणि याला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सूर्यवंशी'कडून मोठ्या अपेक्षा आहेत.
अतरंगीमध्ये सारासोबत दिसणार अक्षय
2021 मध्ये रिलीज होणारा अक्षय कुमारचा दुसरा सिनेमा 'अतरंगी' आहे. या सिनेमात अक्षय कुमार सारा खानसोबत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत. दक्षिणमधील बड्या स्टार धनुष ही यात झळकणार आहे. धनुषने यापूर्वी आनंद एल राय सोबत 'रांझाणा'मध्ये काम केले आहे.
अक्षयने बेलबॉटमचे शूटिंग केले पूर्ण
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार त्याच्या टीमसोबत परदेशात जाऊन 'बेलबॉटम' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी करुन आला आहे. 'बेलबॉटम'चे दिग्दर्शन रणजित एम तिवारी करत आहेत. अक्षयसोबत वाणी कपूर, हुमा, कुरेशी आणि लारा दत्तादेखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी 2 एप्रिलला रिलीज होणार आहे.
क्रिती सॅनॉन 'बच्चन पांडे'मध्ये दिसणार
अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' 2021 मध्येच रिलीज होऊ शकतो. हा चित्रपट दक्षिणेतील सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करीत आहेत. या सिनेमात अक्षयसोबत पंकज त्रिपाठीही दिसणार आहेत. क्रिती सॅनॉन देखील हिरोईनच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. या चित्रपटात अर्शद वारसी अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे.
रक्षाबंधन
3 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या निमित्ताने अक्षय कुमारने एका नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. 'रक्षाबंधन' असे या सिनेमाचे नाव आहे. आनंद एल राय हे दिग्दर्शन करणार आहेत. अक्षयने सांगितले की आतापर्यंत त्याच्या कारकीर्दीत हा असा सिनेमा आहे जो त्याने सर्वात लवकर साइन केले आहे. हा सिनेमा 5 नोव्हेंबर 2021 ला थिएटरमध्ये रिलीज होणार.
नुकतेच अक्षय कुमारने राम सेतूची घोषणा केली. 2021 मध्ये याची शूटिंग होईल आणि हा चित्रपट वर्षाच्या शेवटी किंवा 2022 मध्ये रुपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येऊ शकतो. याबद्दल अद्याप कोणतीही खात्री नाही.