Join us  

Manushi Chhillar: 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर देशातील बड्या उद्योगपतीच्या प्रेमात? कोण आहे तो जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 4:39 PM

विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

नवी दिल्ली-

विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मानुषीच्या प्रेमकहाणीची चर्चा आता सोशल मीडियात रंगू लागली आहे. देशातील एका बड्या उद्योगपतीला मानुषी डेट करत असल्याचं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये दिलं जात आहे. त्यावरुन नेटिझन्सही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 

मानुषीनं नुकतंच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सम्राट पृथ्वीराज सिनेमाची जादू बॉक्स ऑफीसवर चालली नसली तरी मानुषीच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिनं केलेलं काम नक्कीच दखलप्राप्त असल्याच्या भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या होत्या. आता मानुषीच्या प्रेमकहाणीच्या चर्चेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

विश्वसुंदरीचा खिताब पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर प्रकाशझोतात आली. या पुरस्कारानंतर ती बॉलीवूडमध्ये येणार हेही जवळपास निश्चित झालं होतं. तिला सिनेमांच्या ऑफरही येऊ लागल्या होत्या. अगदी मानुषीनंही अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आणि सम्राट पृथ्वीराज सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

प्रोफेशनल लाईफ बद्दल नेहमीच भरभरून बोलणारी मानुषी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत क्वचितच दिलखुलासपणे बोलताना दिसते. मानुषी ही आता प्रसिद्ध उद्योगपती निखिल कामत यांच्या प्रेमात असल्याचं बोललं जात आहे. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबत दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

कोण आहे निखील कामत?निखील कामत आज भारतातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आणि देशातील मोठा उद्योग ब्रोकरेज जेरोधा (Zerodha) चे सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु खूप कमी जणांना माहिती असेल की, शाळा सोडल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी निखील कामत यांनी व्यवसाय करण्यास सुरूवात केली. ३४ वर्षीय निखील कामत यांनी ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे बालपण आणि अब्जाधीश बनण्याचा प्रवास कसा केला याची माहिती दिली होती. 

वयाच्या १८ व्या वर्षी निखील यांनी स्टॉक ट्रेडिंग सुरू केली. वडिलांनी बचतीच्या पैशातून काही पैसे दिले त्यातून निखील यांनी काम सुरू केलं. कॉल सेंटरमधील बॉस आणि सहकाऱ्यांकडून पैशाचं नियोजन केलं. त्यानंतर मोठा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामत असोसिएट्स सुरू करण्यासाठी कॉल सेंटरचा जॉब सोडला. २०१० मध्ये त्यांनी बचतीच्या पैशातून 'जेरोधा' सुरू केलं. ब्लूमबर्गनुसार, आज 'जेरोधा'ची आर्थिक उलाढाल ३५ अब्ज असेल. 'जेरोधा' ही देशातील पहिली ऑनलाईन ब्रोकरेज फर्म आहे. कमी गुंतवणुकीत सुरू झालेली ही कंपनी रिटेल शेअर ब्रोकिंगचं काम करते. परंतु आज ही कंपनी इक्विटी, बॉन्ड, करेंसी, कमॉडिटी, म्युचूअल फंडमध्ये ट्रेडिंग ऑफर करते. या कंपनीचं विशेष म्हणजे ब्रोकरेज चार्ज घेत नाहीत पण प्रत्येक ट्रेडसाठी २० रुपये चार्ज घेतात. मग ती ट्रेडिंग मोठी असो वा छोटी.

टॅग्स :मानुषी छिल्लर