जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत 179 देशांना विळखा घातला असून, 11267 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे. रविवारी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, त्यानिमित्तानं देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत. अभिनेता अक्षय कुमार व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना घरा बाहेर पडू नका असं आवाहन करताना दिसतो आहे.
अक्षय कुमार, ''मी घरी आहे आणि मला आशा आहे की तुम्हीसुद्धा घरी असला जर नाही आहेत तर काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर असला. आपलं बाहेर जाणं गरजेचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वत:ला विचारण्याची गरज आहे. मुंबई एअरपोर्टवर कोरोनाची टेस्ट केली जाते आहे यात ज्यांची टेस्ट नेगेटिव्ह येतेय त्यांच्या हातावर सेल्फ क्वारंटाईनचा स्टॅम्प माराला जातो आहे. हे लोक दोन आठवडे लोकांच्या संपर्कात येणार नाहीत. मात्र तरीही ही लोक देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतायेत. लग्न समांरभ, पार्टीमध्ये जातायेत. ते फक्त स्वत:चे नाही तर दुसऱ्यांचे आयुष्यासुद्धा संकटात टाकतायेत.''
पुढे तो म्हणतो, ''लोकांना हे कळत का नाही आहे की, कोरोना सुट्टीवर नाही त्याचा ओव्हरटाईम सुरु आहे. या शर्यतीत तो आपल्या पेक्षा पुढे आहे. मात्र शर्यत अजून बाकी आहे आणि आपण ती जिंकू शकतो. ही अशी पहिली शर्यत असेल ज्यात पहिला थांबणारा ही शर्यत जिंकेल. या शर्यतीत एकतर सगळे एकत्र जिंकतील किंवा सगळं एकत्र हरतील.''