अक्षय कुमारने पैशाने विकत घेतली स्वत:ची ‘स्टाईल’! विश्वास बसत नसेल तर वाचा ही बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 07:37 AM2018-04-02T07:37:13+5:302018-04-02T13:07:13+5:30
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आज अॅक्टिंग आणि अॅक्शनशिवाय त्याच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखला जातो. पण मोस्ट स्टाईलिश सेलिब्रिटी ही ओळख ...
ब लिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आज अॅक्टिंग आणि अॅक्शनशिवाय त्याच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखला जातो. पण मोस्ट स्टाईलिश सेलिब्रिटी ही ओळख निर्माण करणे अक्षयसाठी सोपे नव्हतेच. स्वत:चा फॅशन सेन्स विकसीत करण्यासाठी अक्षयला बरेच काही करावे लागले. होय, अक्षयने बºयाच प्रयत्नांती ही ओळख निर्माण केली. नुकतेच अक्षयला जीक्यू स्टाईल अवार्डदरम्यान जीक्यू लीजेंड आॅनरने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याने हा खुलासा केला. माझी स्टाईल मी पैशांनी विकत घेतली आणि हे सत्य आहे, असे अक्षय यावेळी म्हणाला.
‘मी माझी स्टाईल विकत घेतली, हे खरे आहे. इंटरनॅशनल फॅशन मॅगझिनमधील हॉलिवूड सेलिब्रिटींची फॅशन, त्यांची स्टाईल बघून बघून मी शिकलो. त्यांचा फॅशन सेन्स आणि स्टाईल स्वत:त आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इंटरनॅशनल मॅगझिन घ्यायला माझ्याकडे पैसे नसायचे. केवळ ही मॅगझिन्स विकत घेता यावेत म्हणून मी एक एक पैसा जोडायचो. पैसे वाचवून मी या मॅगझिन्स विकत घ्यायचो. याच फॅशन मॅगझिन्समधून मी माझी फॅशन व स्टाईल विकसीत केली. अर्थात हे करणारा मी एकटा नाही. अनेक कलाकारांना मी असे करताना पाहतो,’असे अक्षय यावेळी म्हणाला.
ALSO READ : जर ‘हा’ चित्रपट हिट झाला असता, तर अक्षय-ट्विंकलचे लग्न झालेच नसते!!
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ रिलीज झाला. लवकरच अक्षय ‘गोल्ड’मध्ये एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. अक्षय त्याच्या रफ अॅण्ड टफ भूमिकांसाठी ओळखला जातो. तेवढाच कॉमेडीसाठीही ओळखला जातो. खेळात आधीपासूनच रस असलेल्या अक्षयने बँकॉकमध्ये मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले. पुढे तिथेच शेफ म्हणून तो काम करू लागला. कालांतराने मुंबईत परतल्यावर त्याने मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण वर्ग सुरू केलेत. यादरम्यान अक्षयच्याच एका फोटोग्राफर विद्यार्थ्याने त्याला मॉडेलिंग करण्याचे सूचवले आणि इथेच अक्षयच्या आयुष्याला कलाटणी घेतली. मॉडेलिंग ते अॅक्टींग असा यानंतरचा त्याचा प्रवास सगळ्यांनाच ठाऊक आहे.