Join us

अक्षय कुमारने तोडले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड, मानधनाचा आकडा ऐकून तुमचे डोळे पडतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 16:08 IST

अक्षय 700 कोटींचा बादशाह बनला आहे.

अक्षय कुमार गेल्या काही वर्षांपासून बॅक-टू-बॅक हीट सिनेमा देतोय. प्रत्येक वर्षी अक्षयचे 3 ते 4 सिनेमा रिलीज झाले होते. एकामागोमाग हीट सिनेमा दिल्यानंतर अक्षयने त्याच्या मानधनात चांगलीच वाढ केलीय. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार अक्षयने त्याच्या आगामी सिनेमासाठी 120 कोटी रुपये आकारले आहेत.    

या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय करणार आहेत. आनंद एल राय यांनी याआधी 'तनु वेड्स मनु', 'जीरो' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अली खान आणि साऊथचा सुपरस्टार धनुषसुद्धा दिसणार आहे. गेल्या वर्षभरात अजयने 'हाऊसफुल्ल 4',  'मिशन मंगल', 'गुड न्यूज' सारखे अनेक हीट सिनेमा दिले. या सिनेमांसोबत अक्षय 700 कोटींचा बादशाह बनला आहे. अक्षय कुमार सध्या बॉलिवूडमधला सगळ्यात टॉपचा अभिनेता मानला जातो. त्यामुळे अक्षयच्या टीमला वाटते की त्याला कमीत कमी 100 कोटींचे मानधन मिळाले पाहिजे. 

फोर्ब्स या अमेरिकन मासिकाने सालाबादप्रमाणे यंदाही टॉप 100 सेलिब्रिटींची यादी जारी केली होती. यात अक्षयने तिन्ही खानांसह बॉलिवूड कलाकारांना मागे टाकले होते. या यादीत विराट कोहलीनंतर दुसरं स्थान अक्षय कुमारने पटावले होते. एकूणच बॉक्स ऑफिसवर सध्या अक्षय कुमारचा बोलबाला दिसतोय.

 

टॅग्स :अक्षय कुमार