'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे.
आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने तो काम करतो. त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही... कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही हेच त्याच्या यशाचे खरे गमक आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करताना त्याने स्वतःची काही नियम आखली आहेत. त्यानुसारच तो काम करतो. गेल्या १८ वर्षापासून अक्षयने नेहमीच वेळेचे पालन केले आहे.
सध्या अक्षय स्कॉटलंडमध्ये 'बेल बॉटम' चित्रीकरण करण्यात बिझी आहे. स्कॉटलंडमध्ये पोहोचल्यानंतर चौदा दिवस क्वारंटाइन राहावं लागणार होते. त्यामुळे साहजिकच निर्मात्यांच्या नुकसानही होणार याची आधीच कल्पना अक्षयला होती. निर्मात्यांचं नुकसान होवू नये, त्यासाठी अक्कीनेच पुढाकार घेत त्याचा अठरा वर्षांचा नियम मोडला आहे. गेल्या अठरा वर्षांपासून अक्षय कुमारने दिवसातून आठ तासच काम करायचं असा नियमच बनवला होता. पण, 'बेल बॉटम' चित्रपटाच्या निर्मात्यांचं नुकसान होऊ नये. म्हणून त्याने डबल शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
ल्या काही वर्षांपासून वर्षाला अनेक सिनेमा देणार्या अक्षय कुमारचा यावर्षी एकच सिनेमा आला. पण 2021 मध्ये अक्षय बॉक्स ऑफिसवर धमाका करायला तयार आहे. अक्षयकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. अक्षय कुमारचा सर्वात मोठा सिनेमा 'सूर्यवंशी' यंदा रिलीज होऊ शकला नाही. हा सिनेमा
आता 2021 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिका दिसणार असून या सिनेमाची निर्मिती रोहित शेट्टीने केली आहे. हा एक मोठा बिगबजेट सिनेमा, जो निर्मात्यांनी थांबवला आणि याला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सूर्यवंशी'कडून मोठ्या अपेक्षा आहेत.