Join us

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी अक्षय कुमारने मोडला त्याचा जुना नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 4:56 PM

अनंत आणि राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडला.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन (Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding) नुकतेच जामनगरमध्ये पार पडलं. या प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडपासून (Bollywood) ते हॉलिवूडपर्यंत (Hollywood) अनेक सेलिब्रिटींनी चार चाँद लावले. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खिलाडी कुमार अक्षयनेही या फंक्शनमध्ये जबरदस्त डान्स करत जलवा दाखवला. त्याचे डान्सचे व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडले.

अक्षय कुमारचा दमदार परफॉर्मन्स पाहून मुकेश अंबानी भावूक झाले. परफॉर्मन्सच्या मध्येच त्यांनी अक्षयला मिठी मारली. पण, या फंक्शनसाठी अक्षयला त्याचा अनेक वर्षांचा नियम मोडावा लागला आहे. अक्षय हा रात्री लवकर झोपणारा आणि सकाळी लवकर उठणारा व्यक्ती आहे. पण, या कार्यक्रमासाठी त्याला सकाळी ३ वाजेपर्यंत जाग रहावं लागलं होतं.  हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना अक्षय कुमारने सांगितले की, 'कार्यक्रम हा पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता. अंबानी कुटुंब खूप प्रेमळ आणि काळजी घेणारं आहे. कार्यक्रमात कोणीही एकटे राहू नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अनंत आणि राधिका या सुखी जोडप्यावर महाकालचा आशीर्वाद असो'.

अनंत आणि राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडला. अक्षय कुमारने शनिवारी रात्री परफॉर्म केलं होतं. अक्षयचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये अक्षय ढोल वाजवताना दिसत आहे. अक्षयने अनेक गाण्यांवर डान्स केलाय. यानंतर त्यानं 'गुड नाल इश्क मीठा' हे गाणेही अनंत-राधिकाला समर्पित केलं. 

अक्षय लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. याशिवाय 2024 हे वर्ष अक्षयसाठी खास ठरणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत अक्षयचे जवळपास नऊ चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. यातील दोन चित्रपटांमध्ये त्याचा कॅमिओ असणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'नंतर 'सरफिरा', 'सिंघम अगेन', 'स्काय फोर्स', 'वेलकम टू द जंगल', 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर', 'खेल-खेल में' आणि 'हेरा फेरी 3' यांचा यात समावेश आहे.  

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा