अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून लोकांना त्यासाठी इच्छा आणि कुवतीनुसार निधी देण्याचे केले जातेय. काल अभिनेता अक्षय कुमारनेही हे आवाहन केले. केवळ आवाहन नाही तर राम मंदिरासाठी त्याने दानही दिले. काल एक व्हिडीओ शेअर करत अक्षयने राम मंदिर उभारण्यात योगदान देण्याची विनंती केली. या व्हिडीओला भरभरून लाईक्स आल्यात. पण सोबत यावरून अक्षयला ट्रोलही केले गेले.अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताच, अनेक युजर्सनी त्याच्यावर टीकास्त्र सोडले. अक्षयच्या एका जुन्या मुलाखतीचे कात्रण शेअर करत त्याला ट्रोल केले गेले. शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत अक्षयला जाब विचारला गेला.
एका युजरने अक्षयच्या जुन्या मुलाखतीचे कात्रण शेअर केले. यात अक्षय वैष्णोदेवीला जाण्याबद्दल बोलतो आहे. ‘मी वैष्णोदेवीला खूप मानतो. आधी दरवर्षी तिथे जायचो. पण आता मी ते बंद केले आहे. दोन-अडीच लाखांचा खर्च होता. आता मी हेच दोन-अडीच लाख रूपये कॅन्सर रूग्णांना वा गरजूंना दान करतो. त्यातच मला वैष्णोदेवीचे दर्शन घडते. मला प्रत्यक्ष तिथे जाण्याची गरज नाही. मंदिराचा अर्थ मनाच्या आतले मंदिर हे मला उशीरा कळले,’ असे अक्षय या मुलाखतीत म्हणाला होता. संबंधित युजरने अक्षयला या मुलाखतीची आठवण करून दिली.
एका युजरने त्याला असेच ट्रोल केले. ‘सर, खूप चांगली गोष्ट बोललात. मात्र हाच पैसा एखादी चांगली शाळा आणि हॉस्पिटल्स उभारण्यासाठी गोळा केला असता तर उत्तम झाले असते. कारण संकटात मंदिराची नाही तर या गोष्टींची जास्त गरज पडत असते. कोरोनाकाळात हॉस्पिटल कामाला आले, मंदिरे नाहीत,’ असे या युजरने लिहिले.
‘अक्षयजी इथे दोन वेळच्या जेवायचे वांदे आहेत आणि तुम्ही राम मंदिरात योगदान देण्याबाबत बोलत आहात. हे चुकीचे आहे, नाही का?, असे एका युजरने त्याला सुनावले.
अनेकांनी तर या ट्विटला अक्षयच्या आगामी फिल्मचे प्रमोशनच म्हटले. ‘रामसेतू सिनेमाचे प्रमोशन आत्तापासूनच सुरु केले. राम मंदिराच्या नावावर चित्रपट हिट करायचा आणि मग हिंदू धर्माची खिल्ली उडवून आपल्या बिरादरीतील लोकांना खूश करायचे. तू खूप चांगला अॅक्टर आहेस. पण जनता मूर्ख नाही,’ असे एका युजरने लिहिले.