भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणासोबत अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील कार्यक्रमात अनेकवेळा आपण त्यांना हजेरी लावताना बिघतलं आहे. अलीकडेच त्या छोट्या पडद्यावरील बस बाई बस (bus bai bus) या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या भागांचे प्रक्षेपण आज आणि उद्या होणार आहे. या कार्यक्रमात त्यांनी वैयक्तिक आयुष्यात बाबत अनेक खुलासे केले आहेत. सध्या पंंकजा मुंडे यांचं ट्विट चर्चेत आले आहे. ज्यात त्यांनी अभिनेता अक्षय कुमारचं अभिनंदन केलं आहे. अक्षयने देखील त्यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. दोघांच्या ट्विटची नेटकऱ्यांमध्ये सध्या चर्चा आहे.
पंकजा मुंडे यांचं ट्विट आज रक्षा बंधन मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत ?"रक्षा बंधन"सिनेमा पाहीला.मला खूप भावला.समाजात अजूनही मुली व त्यांचे विवाह कठीण आहेत कारण त्यांची किम्मत मोजावी लागते.fridge,TV,गाड़ी,status या गोष्टींसाठी आपल्या लाडकी चे प्राण ही गमवावे लागतात किती दुर्दैवी आहे हे! मला वाटते #RakshaBandhan सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे.कठीणआहे,आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो.नाते फायदा-तोटा यात बसवत असतो.जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा,काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची, चांगला संदेश देणारा चित्रपट आहे.'' असं म्हणत त्यांनी अक्षय कुमारचं अभिनंदन केलं आहे.
अक्षय कुमारचा रिप्लायअभिनेता अक्षय कुमारने पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. या सिनेमाद्वारे समाजात 5 टक्केही बदल घडवून आणू शकलो तर तो आपल्यासाठी खूप मोठा विजय असेल असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.
कायम बेरजेचं राजकारण करायचं? दरम्यान आज झी मराठी प्रसारित होणार बस बाई बस या कार्यक्रमात त्या राजकारणाती अनेक गुपित उघडी करताना दिसणार आहेत. यावेळी त्यांनी आपण विरोधी पक्षातील नेत्यांनाही फोडलं असल्याचं त्या म्हणाल्या. “कायम बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं नाही, असं बाबा सांगायचे. त्यामुळे इतर पक्षांत चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं.