Join us

"मी चुकीचं केलं.." जया बच्चन यांनी 'टॉयलेट एक प्रेमकथावर' केलेल्या टीकेवर अक्षय कुमारचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:52 IST

"त्या जर असं म्हणत असतील तर..." अक्षय कुमारचं थेट उत्तर

अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  'केसरी २' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. जालियनवाला बाह हत्याकांडामागचं सत्य यामधून दाखवण्यात येणार आहे. अक्षय कुमार आणि आर माधवन सिनेमात वकिलाची भूमिका साकारत आहेत. अक्षयने याआधी समजाला प्रेरित करणारे अनेक हिट सिनेमे दिले. त्यातच एक 'टॉयलेट एक प्रेमकथा'. काही दिवसांपूर्वीच जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी या सिनेमावर टीका केली होती. 'असं कधी नाव असतं का' असं त्या म्हणाल्या होत्या. केसरी २ च्या ट्रेलर लाँचवेळी अक्षय कुमारने त्यावर उत्तर दिलं आहे.

'केसरी २'च्या ट्रेलर लाँचवेळी अक्षय कुमार म्हणाला, "मला नाही वाटत माझ्या त्या सिनेमांनावर कोई टीका केली असेल. कोणी मूर्खच असेल जो टीका करेल. पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा, एअरलिफ्ट, केसरी १ आणि २ हे सिनेमे मी मनापासून बनवले आहेत. असे अनेक सिनेमे आहेत. त्यामुळे यावर टीका करणारा खरंच कोणी मूर्खच असेल. हे सिनेमे लोकांना आरसा दाखवतात."

जया बच्चन यांनी 'टॉयलेट एक प्रेमकथा'या टायटलवर टीका केली. त्यावर अक्षय म्हणाला, "आता त्या जर असं म्हणाल्या असतील तर बरोबरच असेल. मला माहित नाही. जर टॉयलेट एक प्रेकथा सिनेमा बनवून मी काही चुकीचं काम केलं असेल असं त्या म्हणत असतील तर त्यांचं बरोबर असेल."

'हे काय नाव आहे?', जया बच्चन यांची अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' सिनेमावर टीका

अक्षय कुमारने जया बच्चन यांना कोणतंही उलट उत्तर दिलं नाही. त्या म्हणत असतील तर बरोबरच असेल असं म्हणत त्याने जया बच्चन यांचा आदर राखला आहे. यावरुन अक्षयचं कौतुकही होत आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारजया बच्चनबॉलिवूडसिनेमा