Oh No! ‘हेरा फेरी 3’ इतक्यात नाहीच! करावी लागणार दीर्घ प्रतीक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:00 AM2019-04-11T06:00:00+5:302019-04-11T06:00:02+5:30
निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘हेरा फेरी 3’ घोषणा केली होती आणि या चित्रपटासाठी २०१९च्या अखेरच्या महिन्यांतील तारखा लॉक केल्या होत्या. पण आता हा चित्रपट लांबणीवर पडल्याची खबर आहे.
हेराफेरी आणि फिर हेराफेरी या सिनेमांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. आजही चित्रपटांबद्दलचे क्रेज संपलेले नाहीत. साहजिकच, हेराफेरी आणि फिर हेराफेरीचा तिसरा पार्ट अर्थात ‘हेरा फेरी 3’ येणार म्हटल्यावर क्रेजी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘हेरा फेरी 3’ घोषणा केली होती आणि या चित्रपटासाठी २०१९च्या अखेरच्या महिन्यांतील तारखा लॉक केल्या होत्या. पण आता हा चित्रपट लांबणीवर पडल्याची खबर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हेरा फेरी 3’ दिग्दर्शित करणार असलेले इंद्रकुमार या वर्षाच्या अखेरिस चित्रपटाचे शूटींग सुरु करणार होते. मात्र सर्व मुख्य कलाकारांच्या तारखांचा मेळ जमत नसल्याने नियोजित वेळेत ‘हेरा फेरी 3’चे शूटींग सुरु होणे कठीण दिसतेय. दुसरीकडे इंद्रकुमार हेही प्रतीक्षा करण्याच्या मूडमध्ये नाहीत. ‘टोटल धमाल’च्या अभूतपूर्व यशानंतर ते इतके उत्साहित आहेत की, त्यांनी ‘हेरा फेरी 3’ होल्ड ठेवत आपल्या नव्या कॉमेडी चित्रपटाची तयारी केली आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षांत या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असे सांगितले जातेय.
‘हेरा फेरी 3’ या सिनेमासाठी अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची नावे फायनल झाली आहेत. अर्थात अक्षय कुमारने अद्याप या चित्रपटाला होकार दिलेला नाही. अतिव्यस्ततेमुळे ‘हेरा फेरी 3’ साईन करावा की नाही, या विचारात तो आहे. अशात ‘हेरा फेरी 3’साठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते.
२००२ मध्ये प्रदर्शित ‘हेरा फेरी’ हा चित्रपट प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल मुख्य भूमिकेत होते. २००६ मध्ये ‘फिर हेरा फेरी’ नावाने या चित्रपटाचा सीक्वल प्रदर्शित झाला. नीरज वोरा यांनी हा सीक्वल दिग्दर्शित केला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर बंपर कमाई केली होती.