Join us

 ‘सम्राट पृथ्वीराज’नं अक्षय कुमारला दिला ‘जोर का झटका’, कमी केलं मानधन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 5:32 PM

Akshay Kumar : आत्ता आत्तापर्यंत अक्षय म्हणजे पैसा वसूल असंच समीकरण होतं. पण सध्या मात्र अक्षयचं स्टारडम संपलं की काय? अशी शंका यायला लागली आहे.

Akshay Kumar to take fee cut:  अक्षय कुमारला (Akshay Kumar) ‘बॉलिवूडचा खिलाडी’ उगाच म्हणत नाही. आत्ता आत्तापर्यंत अक्षय म्हणजे पैसा वसूल असंच समीकरण होतं. त्यामुळेच बॉलिवूडच्या या ‘हिट मेकर’ला आपल्या चित्रपटात घेण्यास निर्माते एका पायावर तयार असतं. पण सध्या मात्र अक्षयचं स्टारडम संपलं की काय? अशी शंका यायला लागली आहे. कोरोना महामारीआधीपर्यंत अक्षयचे एकावर एक सिनेमे हिट होत होते. पण कोरोना काळात त्याचे अनेक सिनेमे रखडले. कोरोना नियंत्रणात आल्यावर हे सिनेमे रिलीज झालेत. पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. अक्षयचा ‘बच्चन पांडे’ (Bachchhan Paandey) आपटला. पाठोपाठ ‘सम्राट पृथ्वीराज’ सारख्या (Samrat Prithviraj) बिग बजेट सिनेमाचीही बॉक्स ऑफिसवर गत झाली. एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमानंतर अक्षयची नौका डगमगू लागल्याचं मानलं जातंय. या घटत्या लोकप्रियतेचा परिणाम त्याच्या मानधनावरही दिसू लागला आहे.

‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप झाल्यानंतर अक्षयने त्याच्या फीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एकेकाळी अक्षय म्हणजे 100 कोटी पक्के असं मानलं जायचे. पण कोरोना काळानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे अक्षयने म्हणे, त्याच्या मानधनाच्या रकमेत कपात केली आहे. मेकर्सवर कमीत कमी भार पडावा, हा त्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जातेय. अक्षय कुमार अनेक चित्रपटांचा सहनिर्माता म्हणूनही काम करतो. चित्रपट चालला तर त्याच्या नफ्यातील थोडा भाग तो घेणार आहे.

‘बडे मियां, छोटे मियां’ थंडबस्त्यातअक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी ‘बडे मियां, छोटे मियां’ नावाच्या बिग बजेट अ‍ॅक्शन एंटरटेनरची घोषणा केली होती. यात त्याच्यासोबत टायगर श्रॉफही दिसणार होता. पण ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप झाल्यानंतर ‘बडे मियां, छोटे मियां’ हा चित्रपट तूर्तास तरी थंडबस्त्यात गेल्याचं कळतंय. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड