Join us

कोरोनाकाळातही सातासमुद्रापार 'लक्ष्मी' सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई, बॉक्स ऑफिसवरचे आकडे बघून व्हाल अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 3:02 PM

दाक्षिणात्य सिनेमा 'कंचना'चा हिंदी रिमेक असलेला 'लक्ष्मी' सिनेमा भारतातच नाहीतर परदेशातही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. परदेशी बॉक्स ऑफिसवर 'लक्ष्मी' कोरोना व्हायरस आणि निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही जबरदस्त कमाई करतो आहे.

दाक्षिणात्य सिनेमात जे काही असते ते भव्यदिव्य असते हे सा-यांनाच माहिती आहे. दाक्षिणात्य सिनेमाचा विषय, सेट्स, एक्शन सीन्स, गाणी सारं सारं काही डोळे दिपवणारं असंच असते. त्यामुळे बॉलीवुडलाही दाक्षिणात्य सिनेमाची भुरळ पडली. अनेक दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक हिंदीत बनले आहे. इतकंच नाही तर दाक्षिणात्य दिग्दर्शकांना आकर्षित करुन हिंदी सिनेमांची निर्मिती करण्याची बॉलीवुडमध्ये जणू काही स्पर्धा सुरु झाली आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे 'लक्ष्मी' हा सिनेमा. दाक्षिणात्य सिनेमा 'कंचना'चा हिंदी रिमेक असलेला 'लक्ष्मी' सिनेमा भारतातच नाहीतर परदेशातही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.  परदेशी बॉक्स ऑफिसवर 'लक्ष्मी' कोरोना व्हायरस आणि निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही जबरदस्त कमाई करतो आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी लक्ष्मी चित्रपटाबाबत एक ट्विट केलं आहे. त्यानुसार या चित्रपटाने एका आठवड्यात युएईमध्ये 1.46 कोटींचं कलेक्शन केलं आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये 70.48 लाख, फिजीमध्ये 17.16 लाख आणि न्यूजीलँडमध्ये 42.38 लाखांची कमाई केली आहे.सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये कोरोना संपण्याचे नाव घेत नाही. परिणामी दुस-यांदा लॉकडाऊन करण्याची वेळ अनेक देशांवर आली आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सगळेच ठप्प होते. हळुहळु सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. अशातही 'लक्ष्मी' सिनेमाने भारतातच नाही तर परदेशातही रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. 

‘बेल बॉटम’ या सिनेमाचे शूटींग सुरु असतानाच अक्षयने या कॉमेडी सिनेमासाठी होकार दिला होता. या आगामी सिनेमाचा प्रॉडक्शन बजेट 35 ते 40 कोटी रूपये आहे. मात्र एकूण बजेट 150 कोटी रूपयांवर पोहोचला आहे. कारण केवळ अक्षय कुमारलाच मानधनापोटी 100 कोटी रूपये फी देण्यात येणार आहे. हा सिनेमा अक्षय केवळ 45 दिवसांत पूर्ण केले. यामुळे चित्रपटात संभाव्य तोट्याची शक्यता कमी आहे. तसेही सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिक राईट्स विकून चित्रपटावर लागलेले अर्धे पैसे वसूल होतील. बाकीचे अर्धे पैसे थिएटरमधून निघतील.

टॅग्स :अक्षय कुमार