Join us

अक्षय कुमारवर ‘लक्ष्मी’ची कृपादृष्टी, वाद आणि विरोधानंतरही सिनेमाने वर्ल्डवाईड केली इतकी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 5:17 PM

देशात या सिनेमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पण विदेशात मात्र अक्षयवर ‘लक्ष्मी’ची कृपा झाली.

ठळक मुद्देअक्षय कुमारचा हा सिनेमा रिलीजआधीच प्रचंड वादात सापडला होता. ट्रेलर रिलीज होताच हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला होता.

अक्षय कुमार व कियारा अडवाणी स्टारर ‘लक्ष्मी’ या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमावरून झालेला वाद तुम्हाला आठवत असेलच.  ट्रेलर प्रदर्शित होता हा सिनेमा वादात सापडला होता. सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत ‘लक्ष्मी’वर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावर केली गेली होती. शिवाय सिनेमाच्या आधीच्या शीर्षकावरही  नेटक-यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. इतक्या वादानंतर हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. देशात या सिनेमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पण विदेशात मात्र अक्षयवर ‘लक्ष्मी’ची कृपा झाली. विदेशात अक्षयचा हा सिनेमा जोरदार कमाई करतोय.

‘लक्ष्मी’ हा सिनेमा भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. वर्ल्डवाईड प्रदर्शित होणारा मार्च 2020 नंतरचा अक्षयचा हा पहिला सिनेमा आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाच्या वर्ल्डवाईड कमाईचे आकडे शेअर केले आहेत.

त्यानुसार ऑस्ट्रेलियामध्ये चित्रपटाने 40.09 लाख रुपये कमाई केली.

न्यूझीलंडमध्ये अक्षयच्या या सिनेमाने 28.38 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

फिजीमध्ये 10.34 लाख रुपये कमाई केली आहे. कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही चित्रपटासाठी कमाईचे हे आकडे सुखावणारे आहेत.

खराब रेटींग, पण व्ह्युजचा रेकॉर्डलक्ष्मी या सिनेमाला भलेही खराब रेटींग मिळाले असेल, पण या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. ओटीटीवर रिलीज होताच या सिनेमाने पहिला रेकॉर्ड कायम केला. तो म्हणजे,हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवरचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरला. याबद्दल अक्षयने आनंद व्यक्त केला होता.

अक्षय कुमारचा हा सिनेमा रिलीजआधीच प्रचंड वादात सापडला होता. ट्रेलर रिलीज होताच हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला होता. यानंतर या सिनेमाच्या टायटलवरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. सोशल मीडियावर सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी या सिनेमाचे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ असे नवे नामकरण करण्यात आले होते. या चित्रपटात अक्षय कुमार व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. अक्षयने आसिफ ही भूमिका साकारली आहे. तर कियाराने प्रिया ही व्यक्तीरेखा वठविली आहे. लक्ष्मी हा साऊथच्या ‘कंचना’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

Memes : ‘लक्ष्मी’ ठरला ‘फुसका बार’, नेटकऱ्यांनी अशी घेतली अक्कीची मजा

Laxmii Movie Review: 2020 मधील अक्षय कुमारचा सर्वात ‘बकवास’ सिनेमा

टॅग्स :लक्ष्मी बॉम्बअक्षय कुमार