Join us

एकानंतर एक फ्लॉप सिनेमे देणाऱ्या अक्षयचा लूकही Flop! म्हातारा म्हणत नेटकऱ्यांनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 10:58 IST

पांढरी दाढी, चेहऱ्यावर निराशा... अक्षय कुमारचा लूक पाहून चाहते शॉक

अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) काल फराह खान आणि साजिद खानची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी फराहच्या आईचं निधन झालं. शाहरुख खानसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी फराहची भेट घेतली. तर काल अभिनेता अक्षय कुमारही फराह आणि साजिदच्या घरी पोहोचला. यावेळी अक्षयचचा लूक पाहून चाहते शॉक झालेत. कारमध्ये बसतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

अक्षय कुमारचे मागील ९ ते १० सिनेमे सलग फ्लॉप झाले. आता त्याचा आगामी 'खेल खेल मे'रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा 'सरफिरा' रिलीज झाला. हाही सिनेमा फारशी कमाल दाखवू शकला नाही.  नुकताच अक्षय फराह खान आणि साजिद खानचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला. त्यांची आई मेनका ईरानी यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. फराह आणि साजिदशी अक्षयचं मैत्रीपूर्ण नातं आहे. दोघांच्या निर्मितीखाली त्याने अनेक सिनेमे केले आहेत. दरम्यान त्यांची भेट घेतल्यानंतर साजिद अक्षयला कारपर्यंत सोडण्यासाठी आला. यावेळी अक्षयचा लूक पाहून चाहते शॉक झाले. पांढरा शर्ट, ब्लू जीन्स असा त्याचा आऊटफिट होता. अक्षयची पूर्ण पांढरी दाढी पाहून नेटकरीही शॉक झालेत.

 

अक्षय म्हातारा झाल्याचं नेटकरी म्हणत आहेत. पिक्चरही चालेना आणि लूकही साथ देत नाही असं म्हणत त्याची थट्टा केली जात आहे. जसं अक्षयने कॅमेऱ्यासमोर पाहिलं त्याचं हसूच गायब झालं. त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत आहे अशा नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

अक्षय कुमारचे गेल्या काही वर्षात अनेक चित्रपट फ्लॉप झाले. 'बडे मियाँ छोटे मियाँ','रक्षाबंधन','रामसेतू','सरफिरा' असे एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप झाले.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसोशल मीडियाट्रोल