Join us

​अक्षय कुमारने सौंगध नव्हे तर या चित्रपटातून केली होती कारकिर्दीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 7:06 AM

अक्षय कुमारने गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा खिलाडी असेच त्याला म्हटले जाते. गेल्या ...

अक्षय कुमारने गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा खिलाडी असेच त्याला म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत त्याने एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाहीये. त्याचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिट होणारच हे जणू समीकरणच झाले आहे. कॉमेडी, रॉमँटिक, अॅक्शन कोणतीही भूमिका असो तो तितक्याच ताकदीने सादर करतो. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सोनम कपूर आणि राधिका आपटे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अक्षय व्यग्र आहे.अक्षयने सौंगध या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दिला सुरुवात केली असा सगळ्यांचा समज आहे. पण तुम्हाला माहीत आहे का अक्षयने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात सौंगध नव्हे तर एका दुसऱ्याच चित्रपटाने केली होती. त्याने नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात कऱण्यापूर्वी एका चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. नव्वदीच्या दशकात कुमार गौरवला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग होते. त्याचा आज हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राज बब्बर, स्मिता पाटील, राज किरण यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात अक्षय कुमारने एक छोटीशी भूमिका साकारली होती. अक्षय या चित्रपटात एक कराटे इन्स्ट्रक्टरच्या भूमिकेत होता. या चित्रपटातील त्याची भूमिका ही केवळ काही मिनिटांची होती. या चित्रपटानंतर जवळजवळ चार वर्षांनी म्हणजेच १९९१ मध्ये अक्षयने सौंगध या चित्रपटाद्वारे एक नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण आज या चित्रपटाद्वारे त्याला सगळ्यात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर झळकण्याची संधी मिळाली होती. अक्षयने त्याच्या लहानपणापासूनच कराटेचे शिक्षण घेतले आहे. कराटेत त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला असून मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो अनेक वर्षं बँकॉक मध्ये होता. तेव्हा त्याने तेथील मुय थाय नावाच्या हॉटेलमध्ये काम देखील केले होते. तिथून मुंबईत परतल्यावर तो मुलांना मार्शल आर्ट्सचे धडे देत असे. त्याचवेळी त्याच्या एका विद्यार्थ्याने त्याला मॉडलिंग करण्याविषयी सुचवले. अक्षयच्या लूक्समुळे त्याला लगेचच मॉडलिंगचे असाइनमेंट मिळाले आणि तिथून त्याच्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. Also Read : अक्षय कुमारचा संपूर्ण प्रवास फक्त एका गाण्यात!