Join us

​अक्षय कुमारने ‘पॅड मॅन’ चा उल्लेख करून दिल्या नववर्षाच्या शूभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 9:16 PM

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१६ या वर्षाप्रमाणेच २०१७ हे साल लक ी ठरणार असल्याचे दिसतेय. अक्षयने आपल्या चाहत्यांना नवीन ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१६ या वर्षाप्रमाणेच २०१७ हे साल लक ी ठरणार असल्याचे दिसतेय. अक्षयने आपल्या चाहत्यांना नवीन वर्र्षाच्या शुभेच्छा देताना २०१७ साली प्रदर्शित होणाºया महत्त्वाच्या चित्रपटांची नावे ट्विट करून सांगितली आहे. यातील बहुतेक सर्व चित्रपटांविषयी त्याच्या चाहत्यांना कल्पना आहे, मात्र यातील एका चित्रपटाचे नाव त्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जाहीर केले आहे. २०१७ सालाच्या अखेरीस अक्षय कुमारचा ‘पॅड मॅन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना आपल्या चित्रपटांची नावे जाहीर केली आहेत. यावर्षी अक्षय कुमारचे चार चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. यात सर्वांत आधी सुभाष कपूर दिग्दर्शित ‘द स्टेट व्हर्सेस जॉली एलएलबी २’ हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. या पाठोपाठ भूमी पेंढणेकर हिच्यासोबतचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ २ जून ला प्रदर्शित केला जाणार आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर सुपरस्टार रजनीकांत सोबतच व रोबोट या चित्रपटाचा सिक्वल ‘२.०’ व वर्षाच्या अखेरीस आतापर्यंत चर्चेत नसलेला ‘पॅड मॅन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या शिवाय तापसी पन्नूची प्रमुख भूमिक ा असलेल्या ‘नाम शबाना’ व नीरज पांडे यांच्या ‘क्रॅक’ या चित्रपटात अक्षयचा किमिओ पहायला मिळणार आहे. ‘पॅड मॅन’ व्यतिरिक्त अन्य चित्रपटांची चांगलीच चर्चा होत आहे. मात्र पॅड मॅन हा चित्रपट कोणत्या विषयावर असेल हे गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाचे पोस्टमध्ये सॅनेटरी नॅपकिनचे चित्र दिसते. मात्र, चित्रपटाचे पोस्टर पाहून हा चित्रपट कापूस उत्पादक शेतकºयाची कथा असू शकतो असा अंदाज लावता येतो. यावर एक्स्ट्राआॅडनरी ट्रू स्टोरी असे लिहले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एका गावाला भेट दिली होती. हे गाव त्याने दत्तक घेतले आहे. अक्षयने आपल्या चाहत्यांना दिलेल्या शुभेच्छा वर्षभर पुरणाºया आहेत एवढे नक्की. सुरुवातीपासून वर्षाच्या अखेरपर्यंत अक्षय कुमारचा बॉलिवूडमध्ये जलवा पहायला मिळणार आहे. }}}}